Skip to content
योहान १९:२८-३०

येशूचा मृत्यू: “पूर्ण झाले

योहान १९:२८-३०

येशूचा मृत्यू: “पूर्ण झाले

२८
यानंतर सर्वगोष्टी पूर्ण झाल्या आहेत हे जाणून शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून येशूंनी म्हटले, “मला तहान लागली आहे.”
२९
तिथे शिरक्यात भिजविलेला एक स्पंज एजोबाच्या काठीवर ठेवून व काठी उंच करून त्यांनी येशूंच्या ओठांना लावला.
३०
तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.

हे देखील पहा

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • स्तोत्रसंहिता ६९:२१

    अन्न म्हणून त्यांनी मला विष दिले, तहान भागविण्यासाठी त्यांनी मला आंब दिला.
    वचन २८ मधून
  • योहान १७:४

    तुम्ही दिलेले कार्य समाप्त करून मी तुम्हाला पृथ्वीवर गौरव प्राप्त करून दिले आहे.
    वचन ३० मधून
  • स्तोत्रसंहिता २२:१५

    माझे मुख खापरीप्रमाणे शुष्क झाले आहे; माझी जीभ माझ्या टाळूला चिकटली आहे; तुम्ही मला मृत्यूच्या धुळीत मिळविले आहे.
    वचन २८ मधून
  • फिलिप्पैकरांस २:८

    मानवी रूप धारण करून त्यांनी स्वतःस लीन केले, येथपर्यंत की आज्ञापालन करून ते मरावयास, आणि तेही क्रूसावरील मरण पत्करण्यास तयार झाले.
    वचन ३० मधून
  • कलस्सैकरांस २:१४

    आपल्याविरुद्ध असलेले व आपल्याला आरोपी ठरविणारे विधिलेख, त्यांनी आम्हापासून दूर करून क्रूसावर खिळ्यांनी ठोकून कायमचे रद्द केले,
    वचन ३० मधून
  • कलस्सैकरांस २:१७

    हे सर्व केवळ येणार्‍या गोष्टींची छाया असे आहेत, पण खरी वास्तविकता ख्रिस्तामध्ये सापडते.
    वचन ३० मधून
  • योहान १९:३०

    तो चाखल्यावर, येशू म्हणाले, “पूर्ण झाले आहे,” आणि त्यांनी मस्तक लववून प्राण सोडला.
    वचन २८ मधून
  • इब्री १२:२

    आपण आपल्या विश्वासाचा अग्रेसर व पूर्तता करणार्‍या येशूंवर आपले नेत्र स्थिर करावे; कारण त्यांना त्याजपुढे जो आनंद दिसत होता, त्याकरिता त्यांनी लज्जा तुच्छ मानून वधस्तंभ सहन केला आणि ते परमेश्वराच्या सिंहासनाच्या उजवीकडे बसले आहे.
    वचन ३० मधून
  • दानीएल ९:२४

    “तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’ निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.
    वचन ३० मधून
  • योहान १०:११

    “मीच उत्तम मेंढपाळ आहे. उत्तम मेंढपाळ आपल्या मेंढरांकरिता आपला जीव देतो.
    वचन ३० मधून
  • यशायाह ५३:१०

    परंतु त्याला चिरडून टाकावे व पीडित करावे अशीच याहवेहची इच्छा होती, आणि जरी त्याचे जीवन पापार्पण म्हणून अर्पण झाले, तरी तो त्याची संतती बघेल आणि त्याचा जीवनकाल लांबेल, आणि याहवेहची इच्छा त्याच्या हातून सिद्धीस जाईल.
    वचन ३० मधून
  • लूक २३:४६

    तेव्हा येशूंनी पुन्हा एकदा मोठी आरोळी मारून म्हटले, “हे पित्या, मी माझा आत्मा तुमच्या स्वाधीन करतो.” हे शब्द बोलल्यानंतर त्यांनी शेवटचा श्वास घेतला.
    वचन ३० मधून

हे कोठे घडते

All John Sites (Jerusalem)
All John Sites (Jerusalem) View full PDF
John 19:17-29
John 19:17-29 View full PDF
John 7:37-44, John 19:17-29
John 7:37-44, John 19:17-29 View full PDF

Map © Biblica Open Bible Maps · CC BY-SA 4.0

Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options