मुख्य मजकुरावर जा
इय्योब ४१:२२-३४

अभेद्यता व सर्वोच्च सामर्थ्य

इय्योब ४१:२२-३४
२२
त्याच्या मानेत सामर्थ्य राहते; त्याच्यापुढे भीती चालत असते.
२३
त्याच्या मांसाचे थर घट्टपणे जोडलेले आहेत; ते दृढ आणि अढळ असतात.
२४
त्याची छाती खडकासारखी कडक आहे, जात्याच्या तळीसारखी कणखर आहे.
२५
तो जेव्हा उभा राहतो, पराक्रमी भयभीत होतात; त्याचा वार होण्याआधीच ते माघार घेतात.
२६
त्याच्यावर वार केलेल्या तलवारीचा, अथवा भाला, बरची किंवा बाणाचा त्याच्यावर काहीही प्रभाव पडत नाही.
२७
लोखंडाला तो वाळलेल्या गवतासारखे आणि कास्याला कुजलेले लाकूड असे लेखतो.
२८
बाण त्याला पळवून लावू शकत नाही; आणि गोफणधोंडे त्याला भुसकटासारखे आहेत.
२९
लाठी त्याला पेंढीच्या तुकड्यासारखीच वाटते; भाल्याच्या खुळखुळण्याला तो हसत असतो.
३०
त्याच्या पोटावरील भाग तीक्ष्ण धारेच्या खापर्‍यांसारखा आहे, मळणीच्या घणाप्रमाणे आपल्या खुणा चिखलावर मागे सोडतो.
३१
तो खोल समुद्राला उकळत्या कढईप्रमाणे घुसळतो आणि तेलाच्या पात्रासारखे सागरास ढवळतो.
३२
तो आपल्यामागे चमकणारा मार्ग सोडतो; की एखाद्याला वाटेल की सागराला पांढरे केस आहेत.
३३
त्याच्यासारखे पृथ्वीवर काहीही नाही; तो एक निर्भय प्राणी आहे.
३४
तो घमेंडखोरांना खाली बघायला लावतो; जे सर्व गर्विष्ठ आहेत, त्यांचा तो राजा आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options