इय्योब ४२:१-६
१
मग इय्योबाने याहवेहला म्हटले,
२
“तुम्हाला सर्वगोष्टी शक्य आहेत हे मला माहीत आहे; तुमचा कोणताही उद्देश निष्फळ होत नाही.
३
तुम्ही विचारले, ‘हा कोण आहे जो अज्ञानी शब्दांनी माझ्या योजना अस्पष्ट करतो?’ खरोखर अद्भुत आणि माझ्या समजबुद्धीत नसणार्या गोष्टी, त्याविषयी मी बोललो.
४
“तुम्ही म्हणाला, ‘आता ऐक आणि मी बोलणार; मी तुला प्रश्न करणार, आणि तू मला उत्तर देशील.’
५
माझ्या कानांनी तुमच्याविषयी ऐकले होते परंतु आता माझ्या डोळ्यांनी तुम्हाला पाहिले आहे.
६
म्हणून मी माझाच तिरस्कार करतो, आणि धूळ व राखेत बसून पश्चात्ताप करतो.”
Settings