मुख्य मजकुरावर जा
इय्योब १७:११-१६

हरवलेली आशा व कबरेची निश्चितता

इय्योब १७:११-१६
११
माझे दिवस निघून गेले आहेत, माझ्या योजना विखुरल्या आहेत. परंतु माझ्या हृदयाची आशा भंगली नाही.
१२
ते रात्रीला दिवसात बदलतात; आणि अंधारात असूनही दिवस जवळ आहे असे म्हणतात.
१३
ज्या घराची मी आशा धरतो, ती जर कबर आहे, अंधकाराच्या राज्यात जर मी माझे अंथरूण पसरेल,
१४
जर कुजण्याला, ‘तू माझा पिता आहेस’ असे म्हटले आणि किडण्याला, ‘माझी आई’ किंवा ‘माझी बहीण’ म्हणेन,
१५
तर मग माझी आशा कुठे आहे— आणि कोण माझ्यासाठी आशावादी असणार?
१६
ती अधोलोकाच्या द्वारात जाणार का? आम्ही दोघेही धुळीमध्ये एकत्रच जाणार का?”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options