Skip to content
याकोब ४:५-६

याकोब ४:५-६

त्याने जो आत्मा आपल्या ठायी ठेवला आहे तो सौम्य ईर्षेने आपल्यावर नजर ठेवतो, हे शास्त्राचे म्हणणे व्यर्थ आहे असे तुम्हास वाटते का?
परंतु ते आपल्याला अधिक कृपा देतात, यामुळे शास्त्रवचन सांगते, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • मत्तय २३:१२

    कारण जे स्वतःला उच्च करतात, त्यांना नम्र केले जाईल आणि जे स्वतःला नम्र करतात, ते उंच केले जातील.
    वचन ६ मधून
  • नीतिसूत्रे ३:३४

    उपहास करणार्‍या गर्विष्ठांचा ते उपहास करतात, परंतु जे नम्र आणि पीडित आहेत त्यांच्यावर ते कृपा करतात.
    वचन ६ मधून
  • 2 करिंथकरांस ६:१६

    आणि परमेश्वराचे मंदिर व मूर्ती, यांच्यामध्ये कसा मेळ बसणार? कारण आम्ही परमेश्वराचे मंदिर, जिवंत परमेश्वराचे घर आहोत आणि परमेश्वराने म्हटले आहे: “मी त्यांच्यामध्ये राहीन आणि त्यांच्यामध्ये चालेन; मी त्यांचा परमेश्वर होईन आणि ते माझे लोक होतील.”
    वचन ५ मधून
  • 1 करिंथकरांस ६:१९

    तुमचे शरीर परमेश्वराने तुम्हाला दिलेल्या पवित्र आत्म्याचे मंदिर आहे आणि ते तुमच्यामध्ये राहतात, हे तुम्हाला माहीत नाही काय? तुम्ही स्वतःचे नाही;
    वचन ५ मधून
  • 1 पेत्र ५:५

    त्याच प्रकारे तुम्ही जे तरुण आहात, तुमच्या वडीलधार्‍यांच्या अधीन राहा. तुम्ही सर्वजण एकमेकांबरोबर नम्रता परिधान करून राहा, कारण, “परमेश्वर गर्विष्ठांचा विरोध करतात परंतु नम्रजनावर कृपा करतात.”
    वचन ६ मधून
  • गणना ११:२९

    पण मोशे म्हणाला, “माझ्यासाठी तू त्यांचा हेवा करतोस काय? माझी तर इच्छा आहे की, याहवेहचे सर्व लोक संदेष्टे असावेत आणि याहवेहने सर्व लोकांवर आपला आत्मा ठेवावा!”
    वचन ५ मधून
  • नीतिसूत्रे १८:१२

    मनुष्याचा नाश होण्याआधी त्याचे हृदय गर्वाने भरते, परंतु सन्मान मिळण्याआधी मनुष्यास नम्रता येते.
    वचन ६ मधून
  • स्तोत्रसंहिता १३८:६

    याहवेह महान असले तरी ते दीनांची दयेने काळजी घेतात; गर्विष्ठ लोकांना मात्र ते दुरूनच ओळखतात.
    वचन ६ मधून
  • नीतिसूत्रे २९:२३

    अहंकार व्यक्तीच्या अधःपतनाचे कारण ठरतो; परंतु जो आत्म्याने नम्र आहे, त्याला सन्मान मिळतो.
    वचन ६ मधून
  • नीतिसूत्रे ६:१६

    याहवेह सहा गोष्टींचा द्वेष करतात, त्यांना सात गोष्टींचा तिटकारा वाटतो:
    वचन ६ मधून
  • नीतिसूत्रे ६:१७

    गर्विष्ठ नजर, खोटे बोलणारी जीभ, हात, जे निष्पाप व्यक्तीचा रक्तपात करतात,
    वचन ६ मधून
  • नीतिसूत्रे २२:४

    याहवेहचे भय ही नम्रता आहे; त्याचे वेतन संपत्ती, सन्मान व दीर्घायुष्य आहे.
    वचन ६ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options