मुख्य मजकुरावर जा
उत्पत्ती २१:१-८

इसहाकाचा जन्म व नामकरण

उत्पत्ती २१:१-८
यानंतर याहवेहने आपल्या म्हणण्याप्रमाणे साराहवर अनुग्रह केला आणि तिला दिलेले वचन पूर्ण केले.
साराह गर्भवती झाली आणि परमेश्वराने नियुक्त केलेल्या वेळी अब्राहामाला त्याच्या वृद्धापकाळात तिच्यापासून एक पुत्र झाला.
अब्राहामाने साराहपासून जन्मलेल्या पुत्राचे नाव इसहाक असे ठेवले.
इसहाक जन्मल्यानंतर आठ दिवसांनी, परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे, अब्राहामाने त्याची सुंता केली.
जेव्हा इसहाकाचा जन्म झाला, त्यावेळी अब्राहाम शंभर वर्षांचा होता.
साराह म्हणाली, “परमेश्वराने मला हसविले आहे आणि जे याबद्दल ऐकतील, ते माझ्याबरोबर आनंद करतील.”
आणि ती अजून म्हणाली, “अब्राहामाला कोणी सांगितले असते काय की साराह तिच्या बाळाला स्तनपान करेल? तरीही मी अब्राहामाला त्याच्या म्हातारपणी एक अपत्य दिले आहे.”
ते बाळ वाढू लागले आणि ज्या दिवशी इसहाकाचे दूध तोडण्यात आले, त्या दिवशी अब्राहामाने एक मोठी मेजवानी दिली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options