Skip to content
यहेज्केल ४८:८-१४

यहेज्केल ४८:८-१४

“यहूदीयाच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत भाग तू विशेष भेट म्हणून द्यावा. तो पंचवीस हजार हात रुंद, आणि त्याची लांबी पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत इतर गोत्रांना दिलेल्या भागासमान असावी; त्याच्या मधोमध पवित्रस्थान असेल.
“जो विशेष भाग तू याहवेहस अर्पण करावयाचा आहे, तो पंचवीस हजार हात लांब आणि दहा हजार हात रुंद असावा.
१०
याजकांसाठी हा पवित्र भाग असणार. उत्तरेस त्याची लांबी पंचवीस हजार हात, पश्चिमेकडून रुंदी दहा हजार हात, पूर्वेकडून रुंदी दहा हजार हात आणि दक्षिणेकडून लांबी पंचवीस हजार हात. त्याच्या मधोमध याहवेहचे पवित्रस्थान असावे.
११
सादोकाच्या संतानातील पवित्र केलेले याजक, जे माझी सेवा करण्यात विश्वासू होते आणि जेव्हा इस्राएली लोक बहकून गेले, तेव्हा जसे लेवी लोक बहकले, तसे ते बहकले नाही.
१२
देशाच्या पवित्र भागातून त्यांच्यासाठी ही एक विशेष भेट असेल, तो लेवी लोकांच्या सीमेला लागून आहे.
१३
“याजकांच्या सीमेस लागून लेवी लोकांसाठी पंचवीस हजार हात लांबीचा व दहा हजार हात रुंदीचा प्रदेश द्यावा. त्याची एकूण लांबी पंचवीस हजार हात आणि रुंदी दहा हजार हात असावी.
१४
त्यातील काहीही त्यांनी विकू नये किंवा बदलू नये. ही सर्वोत्तम भूमी आहे ती दुसर्‍या कोणाच्या हाती जाऊ देऊ नये, कारण ती याहवेहसाठी पवित्र आहे.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options