Skip to content
यहेज्केल ४८:२३-२९

देशाची विभागणी: दक्षिणेकडील वंश

यहेज्केल ४८:२३-२९
२३
“बाकीच्या गोत्रांसाठी: “पूर्वेच्या बाजूपासून पश्चिमेकडे जाणारा एक भाग बिन्यामीनचा.
२४
बिन्यामीनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग शिमओनचा.
२५
शिमओनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग इस्साखारचा.
२६
इस्साखारच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग जबुलूनचा.
२७
जबुलूनच्या सीमेला लागून पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत एक भाग गादचा असणार.
२८
गादची दक्षिणेकडील वतनाची सीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत जाईल.
२९
“हा देश तू इस्राएलच्या गोत्रांना त्यांचे वतन म्हणून द्यावे, आणि हे त्यांचे भाग असतील,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options