यहेज्केल ४८:३०-३५
३०
“शहरातून बाहेर जाण्याचे मार्ग हे असतील: “उत्तरेकडील सुरुवात जी चार हजार पाचशे हात लांब आहे,
३१
शहराची द्वारे इस्राएल गोत्रांच्या नावानुसार असतील. उत्तरेकडील तीन द्वारे असतीलः रऊबेनचे द्वार, यहूदाहचे द्वार आणि लेवीचे द्वार असणार.
३२
पूर्वेची बाजू जी चार हजार पाचशे हात लांब आहे, तिथे तीन द्वारे असतील: योसेफाचे द्वार, बिन्यामीनचे द्वार आणि दानचे द्वार.
३३
दक्षिणेची बाजू जिचे माप चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: शिमओनचे द्वार, इस्साखारचे द्वार आणि जबुलूनचे द्वार.
३४
पश्चिमेची बाजू जिची लांबी चार हजार पाचशे हात आहे, तिथे तीन द्वारे असतील: गादचे द्वार, आशेरचे द्वार आणि नफतालीचे द्वार.
३५
“चोहीकडील अंतर अठरा हजार हात असणार. “आणि त्या काळापासून शहराचे नाव, ‘याहवेह-शाम्माह’ असे असणार.”
Settings