मुख्य मजकुरावर जा
यहेज्केल ४७:१३-२३

देशाच्या सीमा व वतन

यहेज्केल ४७:१३-२३
१३
सार्वभौम याहवेह असे म्हणतात, “देशाच्या या सीमा आहेत, जेव्हा इस्राएलच्या बारा गोत्रांना त्यांचे वतन म्हणून या देशाची तू विभागणी करशील, त्यात दोन भाग योसेफाचे असतील.
१४
त्यांच्यात तो देश तू समानतेने वाटावा. कारण मी हात उंच करून शपथ घेतली होती की, मी हा देश तुमच्या पूर्वजांना देईन, हा देश तुमचे वतन होईल.
१५
“देशाची सीमा ही असावी: “उत्तरेस ती भूमध्य समुद्राकडून हेथलोन मार्गापलिकडे लबो-हमाथ पासून जेदादपर्यंत असेल,
१६
बेरोथाह व सिबराईमपासून (जी दिमिष्क व हमाथाच्या मध्ये आहे), हाजेर-हत्तीकोनपर्यंत, जे हवरानच्या सीमेवर आहे.
१७
ही सीमा समुद्रापासून हाजार-एनानपर्यंत वाढेल, जी दिमिष्कच्या उत्तरेच्या सीमेपर्यंत असेल व उत्तरेस हमाथची सीमा आहे. ही उत्तरेची सीमा आहे.
१८
पूर्वेकडील सीमा हवरान व दिमिष्कमधून जात, यार्देन नदीच्या बाजूने गिलआद व इस्राएल देशातून, मृत समुद्रापर्यंत जाईल आणि पुढे तामारपर्यंत. ही पूर्वेकडील सीमा.
१९
दक्षिणेच्या बाजूने वतनसीमा तामारपासून मरीबाह-कादेशच्या पाण्यापर्यंत असेल व इजिप्तच्या खाडीपासून भूमध्य समुद्रापर्यंत. ही दक्षिणेकडील सीमा.
२०
पश्चिमेच्या बाजूने भूमध्य समुद्रापासून लेबो हमाथाच्या समोरच्या भागापर्यंत. ही पश्चिमेकडील सीमा.
२१
“इस्राएलच्या गोत्रानुसार हा देश तुम्ही आपसात वाटून घ्या.
२२
तुम्ही तो तुमच्यासाठी व तुमच्यात राहणार्‍या विदेशी लोकांमध्ये व ज्यांना लेकरे आहेत, त्यांच्यासाठी वतन म्हणून वाटायचे आहे. तुम्ही त्यांना देशात जन्मलेल्या इस्राएली लोकांप्रमाणेच समजले पाहिजे; तुमच्याबरोबर त्यांनाही इस्राएलच्या गोत्रांमध्ये वतन वाटून द्यावे.
२३
कोणत्याही गोत्रांमध्ये विदेशी राहत असेल, तिथे तू त्यांना त्यांचे वतन द्यावे,” असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options