Skip to content
निर्गम ३९:३२-४३

निर्गम ३९:३२-४३

३२
याप्रकारे निवासमंडप व सभामंडप यांचे काम समाप्त झाले. इस्राएली लोकांनी जे काही याहवेहने मोशेला आज्ञापिले होते त्याप्रमाणेच केले.
३३
मग त्यांनी निवासमंडप मोशेकडे आणला: तंबू व त्याचे सर्व सामान, त्याचे आकडे, फळ्या, अडसर, खांब व बैठका;
३४
मेंढ्याच्या लाल रंगवलेल्या कातड्यांचे आच्छादन आणि इतर प्रकारचे टिकाऊ चर्म, झाकण व त्याचा पडदा;
३५
कराराच्या नियमाचा कोश, त्याचे दांडे आणि प्रायश्चिताचे झाकण;
३६
मेज व त्याचे सर्व सामान आणि समक्षतेची भाकर;
३७
शुद्ध सोन्याचे दीपस्तंभ व त्याच्या दिव्यांची रांग व त्याची सर्व उपकरणे आणि प्रकाशासाठी जैतुनाचे तेल;
३८
सोन्याची धूपवेदी, अभिषेकाचे तेल, सुगंधी धूप व तंबूच्या प्रवेशद्वारासाठी पडदा;
३९
कास्याची वेदी व तिची कास्याची जाळी, तिचे दांडे व तिचे सर्व साहित्य; गंगाळ व त्याची बैठक;
४०
अंगणाचे पडदे, खुंट्या व त्यांच्या बैठका आणि अंगणाच्या प्रवेशद्वारासाठी पडदे; दोर्‍या व अंगणासाठी तंबूच्या मेखा; निवासमंडप व सभामंडपा साठी लागणारे सर्व साहित्य;
४१
पवित्रस्थानात सेवा करताना घालावयाची विणलेली वस्त्रे आणि याजक म्हणून घालावयाची अहरोन याजकासाठी पवित्र वस्त्रे व त्याच्या पुत्रांची वस्त्रे.
४२
याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणेच इस्राएल लोकांनी सर्व कामे केली होती.
४३
मोशेने कामाचे परीक्षण केले व पाहिले की त्यांनी याहवेहने आज्ञापिल्याप्रमाणेच केले होते. म्हणून मोशेने त्यांना आशीर्वाद दिला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options