Skip to content
निर्गम १८:१-८

निर्गम १८:१-८

आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.
मोशेने आपली पत्नी सिप्पोराहला व त्याच्या दोन मुलांना आपला सासरा इथ्रो याच्याकडे सोडले होते,
मोशेच्या एका मुलाचे नाव गेर्षोम असे होते; कारण मोशे म्हणाला, “मी परक्या देशात विदेशी झालो आहे.”
दुसर्‍या मुलाचे नाव एलिएजर असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.”
इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला.
इथ्रोने मोशेला निरोप पाठविला, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी पत्नी व दोन मुले घेऊन तुझ्याकडे येत आहे.”
तेव्हा मोशे त्याच्या सासर्‍याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले.
मोशेने आपल्या सासर्‍याला सर्वकाही सांगितले जे इस्राएली लोकांसाठी याहवेहने फारोह व इजिप्तच्या लोकांबरोबर केले आणि वाटेत ज्या अडचणी त्यांना आल्या आणि कशाप्रकारे याहवेहने त्यांची सुटका केली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options