निर्गम १८:१-७
१
आता परमेश्वराने मोशे व त्यांच्या इस्राएली लोकांसाठी काय केले आणि याहवेहने इस्राएली लोकांना कशाप्रकारे इजिप्तमधून बाहेर आणले, याविषयी सर्वकाही मिद्यानी याजक व मोशेचा सासरा इथ्रो याने ऐकले.
२
मोशेने आपली पत्नी सिप्पोराहला व त्याच्या दोन मुलांना आपला सासरा इथ्रो याच्याकडे सोडले होते,
३
मोशेच्या एका मुलाचे नाव गेर्षोम असे होते; कारण मोशे म्हणाला, “मी परक्या देशात विदेशी झालो आहे.”
४
दुसर्या मुलाचे नाव एलिएजर असे ठेवले होते. कारण मोशे म्हणाला, “माझ्या वडिलांचे परमेश्वर माझे साहाय्य झाले; व त्यांनी मला फारोहच्या तलवारीपासून सोडविले.”
५
इथ्रो, मोशेचा सासरा, मोशेची पत्नी व मुलांसोबत, परमेश्वराच्या डोंगराजवळ रानात जिथे त्यांनी तळ दिला होता तिथे आला.
६
इथ्रोने मोशेला निरोप पाठविला, “मी तुझा सासरा इथ्रो, तुझी पत्नी व दोन मुले घेऊन तुझ्याकडे येत आहे.”
७
तेव्हा मोशे त्याच्या सासर्याला भेटायला बाहेर आला आणि नमन करून त्याचे चुंबन घेतले. ते एकमेकांना अभिवादन करून तंबूत गेले.
Settings