- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
पारस आणि ग्रीसचा उदय
दानीएल ११:२-४
पारस आणि ग्रीसचा उदय
२
“आता मी तुला सत्य सांगतो: आता पुढे घडणार्या गोष्टींचा दृष्टान्त मी तुला दाखवितो. पर्शियात आणखी तीन राजे उदयास येतील आणि मग चौथा राजा जो सर्वांहून अतिशय धनवान असेल. तो धनसंपत्तीने प्रबळ झाला म्हणजे तो सर्वांना ग्रीसच्या राज्याविरुद्ध उठवेल.
३
तेव्हा आणखी एक पराक्रमी राजा उदयास येईल, जो महान पराक्रमाने राज्य करेल आणि त्याला वाटेल त्याप्रमाणे तो करेल.
४
त्याचा उदय झाल्यानंतर त्याचे राज्य भंग पावेल आणि चार दिशांत त्याची विभागणी होईल. हे त्याच्या वंशजांकडे जाणार नाही किंवा ज्या सामर्थ्याने त्याने राज्य केले ते त्यांच्याकडे नसेल, कारण त्याचे साम्राज्य उपटले जाईल आणि ते दुसर्यांना दिले जाईल.
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
दानीएल ११:१६
आक्रमण करणारा त्याला वाटेल तसे तो करेल; त्याच्या विरोधात कोणीही उभे राहू शकणार नाही. तो सुंदर देशात स्वतःची स्थापना करेल आणि त्याचा नाश करण्याची शक्ती त्याच्याकडे असेल.वचन ३ मधूनदानीएल ११:३६
“राजा स्वतःच्या इच्छेप्रमाणे वागेल; सर्व दैवतांपेक्षा आपण श्रेष्ठ आहोत असे तो म्हणेल. तो देवाधिदेवाचीही निंदा करेल आणि त्याची महासंकटकाळाच्या शेवटपर्यंत भरभराट होईल. कारण जे ठरवून दिले आहे ते नक्कीच घडेल.वचन ३ मधूनदानीएल ८:८
तो बोकड फार महान झाला, परंतु तो बलिष्ठ झाल्यामुळे त्याचे मोठे शिंग मोडले आणि त्या शिंगाच्या जागी चार ठळक शिंगे फुटली. त्यांची टोके चारही दिशांनी वाढली.वचन ४ मधूनदानीएल ८:२२
तुटलेल्या शिंगाच्या जागी बाहेर आलेली चार शिंगे एकाच देशातून उदयास येणार्या चार राज्यांचे प्रतिनिधित्व करतात, परंतु त्यांची शक्ती पूर्वीच्या राज्यासारखी नसेल.वचन ४ मधूनएज्रा ४:५
त्यांनी अधिकार्यांना त्यांच्या विरोधात काम करण्यासाठी लाच दिली आणि त्यांचे मनसुबे उधळले. पर्शियाचा राजा कोरेशच्या सर्व कारकिर्दीत व दारयावेश राजाच्या राजवटीपर्यंत हे चालले.वचन २ मधूनएज्रा ४:६
नंतर जेव्हा अहश्वेरोश राजाची कारकीर्द सुरू झाली, तेव्हा त्यांच्या शत्रूंनी त्याला यहूदीया व यरुशलेमच्या लोकांविरुद्ध आरोप करणारी काही पत्रे पाठविली.वचन २ मधूनदानीएल ८:२१
तो केसाळ बोकड म्हणजे ग्रीस राष्ट्र होय आणि त्याच्या डोळ्यांच्या मधोमध मोठे शिंग म्हणजे त्या देशाचा पहिला राजा होय.वचन ३ मधूनयिर्मयाह १२:१७
परंतु माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारणार्या राष्ट्राला मी पूर्णपणे मुळासकट उपटून टाकेन व नष्ट करेन,” असे याहवेह जाहीर करतात.वचन ४ मधूनदानीएल ८:२६
“संध्याकाळ आणि सकाळचा दृष्टान्त जो तुला देण्यात आला आहे तो खरा आहे, पण हा दृष्टान्त तू गुप्त ठेव. कारण तो येणार्या भविष्यकाळाशी संबंधित आहे.”वचन २ मधूनप्रकटीकरण २१:५
जे राजासनावर बसले होते ते म्हणाले, “मी सर्वकाही नवीन करीत आहे!” मग ते म्हणाले, “हे लिहून घे; कारण ही वचने विश्वसनीय आणि सत्य आहेत.”वचन २ मधूनदानीएल ५:१९
कारण त्यांनी राजाला असे उच्च स्थान दिले की, सर्व राष्ट्रे आणि प्रत्येक भाषा बोलणारे त्यांच्यासमोर थरथर कापत आणि त्याला भीत असत. राजाला ज्याला ठार करावयाचे होते त्याला ठार करीत असत; ज्याला वाचवायचे होते त्याला वाचवित असत; ज्याला बढती द्यायची त्याला बढती देत असत; आणि ज्याला नम्र करावयाचे त्याला नम्र करीत असत.वचन ३ मधूनदानीएल ७:६
“यानंतर मी पाहिले तो, मला आणखी एक पशू माझ्यापुढे दिसला, तो एखाद्या चित्त्यासारखा दिसत होता. त्याच्या पाठीवर पक्ष्यांसारखे चार पंख होते. या पशूला चार डोकी होती आणि सत्ता गाजविण्याचा त्याला अधिकार देण्यात आला होता.वचन ३ मधून
हे कोठे घडते

अभ्यास टीप
Settings