Skip to content
दानीएल १०:१६-१९

संदेश स्वीकारण्यासाठी दानीएलाला सामर्थ्य मिळते

दानीएल १०:१६-१९

संदेश स्वीकारण्यासाठी दानीएलाला सामर्थ्य मिळते

१६
तेव्हा कोणीतरी जो मानवासारखा दिसणाऱ्याने माझ्या ओठांना स्पर्श केला आणि मी माझे मुख उघडले आणि मी बोलू लागलो. जो माझ्यापुढे उभा होता त्याला म्हटले, “प्रभू या दृष्टान्तामुळे मी मनोवेदनांनी ग्रस्त झालो आहे; आणि माझ्यात काही बळ उरले नाही.
१७
माझ्या प्रभू, मी तुमचा सेवक, मी तुमच्यासोबत कसे बोलू शकतो? माझी शक्ती नष्ट झाली आहे. मला श्वासही घेववत नाही.”
१८
तेव्हा मानवासारख्या दिसणार्‍या पुरुषाने मला पुन्हा स्पर्श केला आणि मला शक्ती दिली.
१९
“भिऊ नको, तू फार परमप्रिय आहेस,” तो म्हणाला. “तुला शांती लाभो! आता बलवान हो; बलवान हो!” जेव्हा त्याने हे म्हटले तेव्हा मला सामर्थ्य आले आणि मी त्याला म्हटले, “माझ्या प्रभू बोला, कारण तुम्ही मला सामर्थ्य दिले आहे.”

उताऱ्याचा अभ्यास

एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.

शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.

  • यशायाह ३५:४

    भयभीत अंतःकरणाच्या लोकांना सांगा, “बलवान व्हा, घाबरू नका; तुमचे परमेश्वर येतील, ते सूड घेण्यास येतील. दैवी प्रतिफळ देऊन तुम्हाला वाचवण्यासाठी येतील.”
    वचन १८ मधून
  • यहोशुआ १:९

    मी तुला आज्ञापिले नाही का? खंबीर हो आणि धैर्यवान हो. भिऊ नको; निराश होऊ नको, कारण तू जिथे जाशील तिथे याहवेह तुझे परमेश्वर तुझ्याबरोबर असतील.”
    वचन १९ मधून
  • शास्ते ६:२३

    परंतु याहवेहने त्याला उत्तर दिले, “शांती असो! भिऊ नकोस. तू मरणार नाहीस.”
    वचन १९ मधून
  • दानीएल ९:२३

    ज्या क्षणाला तू प्रार्थना करण्यास सुरुवात केलीस, त्याच क्षणाला एक आज्ञा देण्यात आली, ती काय आहे हे तुला सांगण्यासाठीच मी आलो आहे. कारण तू अतिशय प्रिय आहेस. म्हणून या गोष्टींचा विचार कर आणि दृष्टान्त नीट समजून घे:
    वचन १९ मधून
  • दानीएल १०:११

    त्याने म्हटले, “हे दानीएला, परमप्रिय पुरुषा, मी जी काही वचने तुला सांगत आहे, ती लक्षपूर्वक ऐक आणि नीट उभा राहा, कारण मला तुझ्याकडे पाठविण्यात आले आहे.” आणि जेव्हा त्याने हे म्हटले, तेव्हा मी थरथर कापत उभा राहिलो.
    वचन १९ मधून
  • दानीएल १०:१२

    तो पुढे म्हणाला, “दानीएला, भिऊ नकोस. कारण ज्या पहिल्या दिवशी तू समजून घेण्यास आणि स्वतःला आपल्या परमेश्वरासमोर नम्र करण्यास मन लावलेस, त्या दिवसापासून तुझे शब्द ऐकण्यात आले आहे आणि आणि मी त्यांना प्रतिसाद म्हणून आलो आहे.
    वचन १९ मधून
  • यशायाह ४३:१

    परंतु आता, याहवेह असे म्हणतात— याकोबा, ज्यांनी तुला निर्माण केले, इस्राएला, ज्यांनी तुझी रचना केली: “भिऊ नको, कारण खंडणी भरून मी तुझी सुटका केली आहे. मी तुला नावाने हाक मारली आहे; तू माझीच आहेस.
    वचन १९ मधून
  • यशायाह ४३:२

    जेव्हा तू खोल जलातून जाशील, मी तुझ्याबरोबर असेन, जेव्हा तू नद्या ओलांडून पुढे जाशील, त्या तुला बुडविणार नाही! जेव्हा तू अग्नीतून चालत जाशील, तू भाजली जाणार नाही. त्या ज्वाला तुला भस्म करणार नाहीत.
    वचन १९ मधून
  • दानीएल ८:१५

    मग मी दानीएल, या दृष्टान्ताचा अर्थ काय असावा ते जाणून घेण्याच्या प्रयत्न करू लागलो, तेवढ्यात एकाएकी मानवासारखा दिसणारा कोणी एक पुरुष माझ्यासमोर उभा राहिला.
    वचन १६ मधून
  • यशायाह ६:७

    माझ्या ओठांना निखाऱ्याने स्पर्श करून तो म्हणाला, “हा निखारा तुझ्या ओठाला लागला आहे, म्हणून तुझ्यातील दोष आता नाहीसा झाला आहे. तुझ्या पातकांसाठी प्रायश्चित करण्यात आले आहे.”
    वचन १६ मधून
  • 2 करिंथकरांस १२:९

    त्यांनी म्हटले, “माझी कृपा तुला पूर्ण आहे. कारण माझे सामर्थ्य अशक्तपणात पूर्णत्वास येते.” कारण माझ्या अशक्तपणाबद्दल मी प्रौढी मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर राहील.
    वचन १८ मधून
  • योहान १४:२७

    शांती मी तुम्हासाठी ठेऊन जातो; माझी शांती मी तुम्हाला देतो. ज्याप्रमाणे जग देते त्याप्रमाणे मी तुम्हाला देत नाही. तुमची मने अस्वस्थ होऊ देऊ नका व भिऊ नका.
    वचन १९ मधून
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options