मुख्य मजकुरावर जा
2 शमुवेल १९:२४-३०

दावीद व मफीबोशेथ

2 शमुवेल १९:२४-३०
२४
शौलाचा नातू, मेफीबोशेथ सुद्धा राजाला भेटण्यास गेला. राजा यरुशलेम सोडून गेल्यापासून सुरक्षित परत येईपर्यंत त्याने आपल्या पायांची काळजी घेतली नव्हती, किंवा दाढी केली नव्हती किंवा कपडे धुतले नव्हते.
२५
जेव्हा तो यरुशलेमातून राजाला भेटायला आला, त्याला राजाने विचारले, “मेफीबोशेथ, तू माझ्याबरोबर का आला नाहीस?”
२६
तो म्हणाला, “माझ्या स्वामी, मी आपला सेवक अपंग आहे, मी म्हणालो, ‘मी माझ्या गाढवावर खोगीर घालून त्यावर बसून माझ्या राजाबरोबर जाईन.’ परंतु माझा सेवक सीबा याने मला फसविले.
२७
परंतु त्याने आपल्या सेवकाविषयी माझ्या स्वामीला खोटे सांगितले. माझे स्वामी तर परमेश्वराच्या दूताप्रमाणे आहेत; म्हणून आपणास जे योग्य वाटेल ते आपण करावे.
२८
माझ्या आजोबांचे सर्व वारसदार माझ्या स्वामीकडून मरणास पात्र होते, परंतु आपण आपल्या सेवकाला आपल्या मेजावर बसणार्‍यांसह पंक्तीस बसविले. त्यामुळे राजासमोर आणखी काही विनंती करण्याचा मला काय अधिकार आहे?”
२९
राजाने त्याला म्हटले, “आणखी काही का बोलावे? माझी आज्ञा आहे की तू व सीबाने जमीन वाटून घ्यावी.”
३०
मेफीबोशेथ राजाला म्हणाला, “ती सर्व जमीन सीबालाच देऊन टाका, आता माझे स्वामी सुखरुप आले आहे.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options