मुख्य मजकुरावर जा
2 राजे १५:३२-३८

योथाम यहूदावर राज्य करतो

2 राजे १५:३२-३८
३२
इस्राएलाचा राजा रमाल्याहचा पुत्र पेकह याच्या दुसर्‍या वर्षी यहूदीयाचा राजा उज्जीयाह याचा पुत्र योथाम राज्य करू लागला.
३३
तो पंचवीस वर्षांचा होता तेव्हा तो राजा झाला आणि त्याने यरुशलेमात सोळा वर्षे राज्य केले. त्याच्या आईचे नाव यरुशा, ती सादोकची कन्या होती.
३४
आपल्या पिता उज्जीयाह प्रमाणे त्यानेही याहवेहच्या दृष्टीने जे योग्य ते केले,
३५
तथापि उच्च स्थाने काढली गेली नव्हती; लोकांनी त्यांची अर्पणे व धूप जाळणे सुरूच ठेवले. योथामाने याहवेहच्या मंदिराचा वरील दरवाजा पुन्हा बांधला.
३६
योथामाच्या राजवटीतील इतर घटना आणि त्याने काय केले हे यहूदीयाच्या राजांच्या इतिहासग्रंथात लिहिलेले नाही काय?
३७
(त्या दिवसात याहवेहने अरामचा राजा रसीन आणि रमाल्याहचा पुत्र पेकह यांना यहूदीयावर स्वारी करण्यास उद्युक्त केले.)
३८
योथाम त्याच्या पूर्वजांबरोबर विसावा पावला आणि त्याला त्यांच्याजवळ, त्याचा पिता दावीदाच्या नगरात पुरण्यात आले. आणि वारस म्हणून त्याचा पुत्र आहाज राजा झाला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options