Skip to content
2 इतिहास ९:१-९

2 इतिहास ९:१-९

जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनच्या किर्तीविषयी ऐकले, तेव्हा कठीण प्रश्न करून शलोमोनची परीक्षा करावी म्हणून ती यरुशलेमास आली. मोठा तांडा घेऊन; उंटांबरोबर सुगंधी द्रव्ये, पुष्कळ सोने आणि मौल्यवान रत्ने घेऊन ती यरुशलेमास आली; शलोमोनकडे येऊन जे काही तिच्या मनात होते त्याविषयी ती त्याच्याशी बोलली.
शलोमोनने तिच्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली; तिला स्पष्ट करू शकणार नाही असे काहीही त्याच्यासाठी कठीण नव्हते.
जेव्हा शबाच्या राणीने शलोमोनचे ज्ञान व त्याने बांधलेला राजवाडा पाहिला,
त्याच्या मेजावरील भोजन, त्याच्या अधिकार्‍यांची आसने, सेवा करणारे सेवक व त्यांचे अंगरखे, प्यालेदार व याहवेहच्या मंदिरात त्याने केलेली होमार्पणे हे सर्व पाहून ती चकित झाली.
ती राजाला म्हणाली, “तुमचे ज्ञान व तुमची प्राप्ती याविषयी माझ्या देशात मी जो अहवाल ऐकला तो सत्य आहे.
परंतु त्यांनी मला जे सांगितले त्यावर मी येथे येऊन या गोष्टी आपल्या स्वतःच्या डोळ्यांनी पाहीपर्यंत विश्वास केला नाही. खचितच तुमचे ज्ञान व संपत्ती याबद्दल मला जे सांगितले गेले ते अर्धे देखील नाही; त्यापेक्षा ते कितीतरी अधिक आहे.
आपले लोक किती सुखी असतील! तुमचे अधिकारी जे तुमच्यासमोर नित्याने उभे राहतात व तुमचे ज्ञान ऐकतात ते किती सुखी असतील!
याहवेह तुमचे परमेश्वर धन्य असो, ज्यांना तुमच्या ठायी संतोष वाटला व तुम्हाला याहवेह तुमचे परमेश्वरासाठी राजा म्हणून आपल्या राजासनावर अधिकार करण्यास ठेवले. कारण तुमच्या परमेश्वराचे इस्राएलवर असलेले प्रेम आणि त्यांना सर्वकाळ पाठिंबा द्यावा अशी त्यांची इच्छा, यासाठी त्यांनी तुम्हाला त्यांच्यावर राजा केले, यासाठी की न्याय आणि धार्मिकता टिकवून धरावी.”
नंतर तिने राजाला एकशेवीस तालांत सोने, पुष्कळ सुगंधी द्रव्ये व मौल्यवान रत्ने दिली. शबाच्या राणीने शलोमोन राजाला जी सुगंधी द्रव्ये आणली त्यासारखी त्यानंतर परत कधी नव्हती.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options