मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास ८:१-६

शलमोनाची बांधकामे व विस्ताराच्या योजना

2 इतिहास ८:१-६
शेवटच्या वीस वर्षात शलोमोनने याहवेहचे मंदिर आणि आपला राजमहाल या दोन इमारतींचे बांधकाम केले.
शलोमोनाने त्याला हीरामकडून मिळालेली नगरे पुन्हा बांधली आणि त्यामध्ये इस्राएली लोकांची वस्ती केली.
नंतर शलोमोन हमाथ-सोबाहकडे गेला आणि ते ताब्यात घेतले
त्याने तदमोर शहरसुद्धा वाळवंटात बांधले आणि भांडारे असलेली सर्व नगरे त्याने हमाथ येथे बांधली.
त्याने वरचे बेथ-होरोन आणि खालचे बेथ-होरोन ही तटबंदीची शहरे, मोठ्या भिंती आणि प्रवेशद्वारांची धातूंचे गज बसवून पुनर्बांधणी केली,
त्याचप्रमाणे बालाथ आणि शलोमोनच्या भांडारांची सर्व शहरे त्याचप्रमाणे त्याचे रथ व त्याचे घोडे यांच्यासाठी सर्व शहरे बांधली; यरुशलेमात, लबानोनात आणि ज्या सर्व राज्यांत त्याचे राज्य होते त्या हद्दींमध्ये त्याच्या मनास येईल ते त्याने बांधले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options