2 इतिहास ८:७-१०
७
हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते.
८
या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे.
९
परंतु इस्राएली लोकांपैकी कोणालाही शलोमोनने आपल्या कामासाठी गुलाम म्हणून लादले नाही; ते त्याचे योद्धे, सेनापती व त्याच्या रथांचे व रथस्वारांचे अधिकारी होते.
१०
शलोमोन राजाचे ते मुख्य अधिकारीसुद्धा होते, माणसांवर देखरेख ठेवणारे दोनशे पन्नास अधिकारी होते.
Settings