मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास ३२:१-८

सन्हेरीब यहूदावर स्वारी करतो

2 इतिहास ३२:१-८
हिज्कीयाहने इतके सर्व विश्वासूपणाने केल्यानंतर, अश्शूरचा राजा सन्हेरीबने यहूदीयावर आक्रमण केले. त्याने तटबंदीच्या शहरांना वेढा घातला या विचाराने की, ती स्वतःसाठी जिंकून घ्यावी.
जेव्हा हिज्कीयाहने पाहिले की सन्हेरीब आला आहे आणि यरुशलेमविरुद्ध युद्ध करण्याचा त्याचा उद्देश आहे,
तेव्हा त्याने त्याच्या अधिकाऱ्यांबरोबर आणि सैन्यातील कर्मचाऱ्यांबरोबर शहरा बाहेरील झर्‍यांचे पाणी बंद करण्याविषयी सल्ला घेतला आणि त्यांनी त्याला मदत केली.
त्यांनी लोकांचा एक मोठा गट जमविला, त्यांनी सर्व झरे आणि जमिनीमधून वाहणारे बंद केले. ते म्हणाले “अश्शूरच्या राजाने यावे आणि त्याने भरपूर पाणी का मिळवावे?”
नंतर त्याने भिंतीचे तुटलेले सर्वभाग दुरुस्त करून त्यावर अत्यंत परिश्रमाने बुरूज बांधले. त्याने त्या भिंतीबाहेर दुसरी भिंत बांधली आणि दावीद नगरीच्या एकमेकांना लागून बांधलेल्या घरांची छते मजबूत केली. त्याने मोठ्या संख्येने शस्त्रे आणि ढालीसुद्धा तयार केल्या.
त्याने लोकांवर सैन्य अधिकारी नेमले आणि त्यांना शहराच्या वेशीवरील चौकामध्ये त्याच्यासमोर आणले आणि त्यांना या शब्दांनी प्रोत्साहन दिले:
“बलवान आणि धैर्यशील असा. अश्शूरचा राजा आणि त्याच्याबरोबर असलेले मोठे सैन्यामुळे तुम्ही घाबरून जाऊ नका किंवा निराश होऊ नका, कारण त्याच्यापेक्षा मोठी शक्ती आपल्यासह आहे.
त्यांच्याबरोबर फक्त शारीरिक शस्त्र आहेत, परंतु आपल्याला मदत करण्यासाठी आणि आपले युद्ध करण्यासाठी आपले परमेश्वर याहवेह आपल्याबरोबर आहेत.” आणि यहूदीयाचा राजा हिज्कीयाह जे काही बोलला त्यावरून लोकांचा आत्मविश्वास वाढला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options