मुख्य मजकुरावर जा
2 इतिहास १८:२८-३४

अहाब रामोथ-गिलाद येथे मारला जातो

2 इतिहास १८:२८-३४
२८
यानंतर इस्राएलचा राजा व यहूदीयाचा राजा यहोशाफाट हे रामोथ गिलआद येथे गेले.
२९
इस्राएलचा राजा यहोशाफाटला म्हणाला, “मी वेश बदलून युद्धात प्रवेश करेन, परंतु तुम्ही तुमची राजवस्त्रे घाला.” म्हणून इस्राएलच्या राजा वेश बदलून युद्धात गेला.
३०
आता अरामाच्या राजाने आपल्या रथांच्या सरदारांना आज्ञा दिली होती, “इस्राएलच्या राजाशिवाय कोणत्याही लहान थोरांशी लढू नका.”
३१
रथांच्या सरदारांनी जेव्हा यहोशाफाटला पाहिले, तेव्हा त्यांना वाटले, “हा इस्राएलचा राजा आहे.” म्हणून ते त्याच्यावर हल्ला करण्यास वळले, पण यहोशाफाटने मोठ्याने धावा केला, आणि याहवेहने त्याला मदत केली. परमेश्वराने त्यांना त्याच्यापासून दूर नेले,
३२
आणि रथांच्या सरदारांनी पाहिले की तो इस्राएलचा राजा नाही तेव्हा त्यांनी त्याचा पाठलाग करण्याचे थांबविले.
३३
पण कोणीतरी सहजच आपला बाण सोडला आणि तो जाऊन इस्राएलच्या राजाच्या चिलखत आणि कमरेचा पट्टा यामधून गेला. राजाने आपल्या रथस्वाराला सांगितले, “रथ मागे फिरव आणि मला युद्धातून बाहेर काढ कारण मी घायाळ झालो आहे.”
३४
तो संपूर्ण दिवस युद्ध वाढत गेले आणि इस्राएलचा राजा संध्याकाळपर्यंत अराम्यांचा सामना करीत रथातच राहिला, आणि सूर्यास्ताच्या वेळी तो मरण पावला.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options