Skip to content
1 शमुवेल २९:१-५

1 शमुवेल २९:१-५

पलिष्ट्यांनी त्यांचे सर्व सैन्य अफेक येथे जमविले आणि इस्राएली सैन्याने त्यांची छावणी येज्रीलच्या झर्‍याजवळ दिली.
पलिष्टी सरदार आपआपल्या शंभराच्या आणि हजारांच्या तुकड्यांबरोबर निघाले आणि त्यांच्यामागे दावीद आणि त्याची माणसे आखीश बरोबर चालू लागले.
तेव्हा पलिष्ट्यांच्या सेनाधिकार्‍यांनी विचारले, “या इब्री लोकांचे येथे काय काम?” आखीशने उत्तर दिले, “हा दावीद नाही काय, जो इस्राएलचा राजा शौल याच्याकडे अधिकारी होता? तो आता एक वर्षाहून अधिक काळ माझ्याबरोबर आहे, आणि त्याने शौलाला सोडले तेव्हापासून आजपर्यंत, मला त्याच्यामध्ये काही दोष सापडला नाही.”
परंतु पलिष्ट्यांचे सेनापती आखीशवर रागावले होते आणि ते म्हणाले, “त्या मनुष्याला परत पाठवून दे, म्हणजे जे ठिकाण तू त्याला दिले आहेस तिथे त्याने परत जावे. त्याने आपल्याबरोबर लढाईमध्ये जाऊ नये, नाहीतर लढाई होत असताना तो आपल्याविरुद्ध लढेल. आपल्याच लोकांचे डोके कापण्यापेक्षा, त्याच्या धन्याची कृपा मिळविणे हे किती चांगले असेल?
हाच तो दावीद नाही काय, ज्याच्याविषयी नृत्य करताना त्यांनी गाईले: “ ‘शौलाने त्याच्या हजारांना मारले, आणि दावीदाने त्याच्या दहा हजारांना मारले?’ ”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Options