Skip to content
1 शमुवेल २८:२०-२५

शौल कोसळतो व त्याला शुद्धीवर आणले जाते

1 शमुवेल २८:२०-२५
२०
शौल लगेच तसाच जमिनीवर पडला, शमुवेलने सांगितलेल्या शब्दांमुळे तो फार भयभीत झाला. त्याच्यात काही शक्ती राहिली नाही, कारण त्याने दिवसभर आणि रात्रभर काहीही खाल्ले नव्हते.
२१
जेव्हा ती स्त्री शौलाकडे आली आणि तिने पाहिले की तो फारच हादरून गेला होता, ती म्हणाली, “पाहा, तुझ्या दासीने तुमचा शब्द मानला आणि माझा जीव मुठीत घेऊन तुम्ही सांगितल्याप्रमाणे केले.
२२
तर आता माझा शब्द माना, मी तुम्हाला थोडे अन्न वाढते ते खा म्हणजे आपल्या वाटेने जाण्यास तुम्हाला शक्ती असावी.”
२३
तो ते नाकारत म्हणाला, “मी खाणार नाही.” परंतु त्याच्या माणसांनीही त्या स्त्रीबरोबर त्याला आग्रह केला, तेव्हा त्याने त्यांचे म्हणणे मानले. तो जमिनीवरून उठून पलंगावर बसला.
२४
त्या स्त्रीच्या घरी एक पुष्ट वासरू होते, ते तिने लवकर कापले. तिने थोडेसे पीठ घेतले, ते मळले आणि खमीर न घालता भाकरी भाजल्या.
२५
नंतर तिने शौल आणि त्याची माणसे यांच्यासमोर ते वाढले आणि त्यांनी ते खाल्ले. नंतर त्याच रात्री ते तिथून निघून गेले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options