Skip to content
1 शमुवेल २९:६-११

आकीश दावीदाला परत पाठवतो

1 शमुवेल २९:६-११
तेव्हा आखीशने दावीदाला बोलावून म्हटले, “जिवंत याहवेहची शपथ, तू विश्वसनीय आहेस आणि सैन्यामध्ये तू माझ्याबरोबर सेवा करावी यात मला आनंद आहे. ज्या दिवशी तू माझ्याकडे आलास तेव्हापासून आजपर्यंत मला तुझ्यामध्ये काही दोष सापडला नाही, परंतु सरदार तुला अनुमती देत नाहीत.
आता तू मागे वळ आणि शांतीने जा; पलिष्टी सरदारांना असंतुष्ट वाटेल असे काहीही करू नकोस.”
दावीदाने आखीशला विचारले, “परंतु मी काय केले आहे? मी आपल्याकडे आलो तेव्हापासून आतापर्यंत आपल्या दासामध्ये काही दोष आढळला आहे काय? माझ्या राजाच्या, मी जाऊन स्वामीच्या शत्रूशी का लढू नये?”
आखीशने दावीदाला उत्तर दिले, “मला माहीत आहे तू माझ्या दृष्टीने परमेश्वराच्या दूतासारखा आहेस; परंतु पलिष्टी सेनापती म्हणतात, ‘त्याने आमच्याबरोबर युद्धास जाऊ नये.’
१०
तर सकाळी लवकर ऊठ आणि तुझ्या धन्याचे जे चाकर तुझ्याबरोबर आले आहेत, त्यांच्याबरोबर पहाट होताच निघून जा.”
११
तेव्हा दावीद आणि त्याची माणसे पहाटेच उठून पलिष्ट्यांच्या प्रदेशाकडे जाण्यासाठी निघाली आणि पलिष्टी सैन्य येज्रीलपर्यंत गेले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options