Skip to content
1 शमुवेल ३०:१-६

दावीद जळालेल्या सिक्लागात परततो

1 शमुवेल ३०:१-६
तिसर्‍या दिवशी दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली. त्या दरम्यान अमालेक्यांनी नेगेव आणि सिकलाग या शहरांवर छापा टाकला होता. त्यांनी सिकलाग शहरावर हल्ला करून ते जाळून टाकले होते,
आणि तेथील स्त्रिया व तिथे असलेल्या प्रत्येक तरुण आणि वृद्धाला त्यांनी कैद करून नेले होते. त्यांच्यातील कोणालाही त्यांनी मारून टाकले नाही, परंतु त्यांना आपल्याबरोबर नेले होते.
जेव्हा दावीद आणि त्याची माणसे सिकलाग येथे पोहोचली तेव्हा त्यांना दिसून आले की, त्या शहराचा अग्नीने नाश झालेला आहे आणि त्यांच्या पत्नी आणि त्यांची मुले व मुली कैद करून नेलेली आहेत.
तेव्हा दावीद आणि त्याची माणसे इतकी मोठ्याने रडली की, आणखी रडण्यास त्यांना शक्ती राहिली नाही.
दावीदाच्या दोन्ही पत्नी, येज्रीली अहीनोअम आणि कर्मेल येथील नाबालाची विधवा अबीगईलला कैद करून नेले होते.
दावीद फार संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावी असे तेथील माणसे बोलत होती; आपआपली मुले व मुली यांच्यासाठी प्रत्येकजण आपल्या हृदयात अतिशय कटुत्वाने भरले होते, परंतु दावीदाला याहवेह त्याचा परमेश्वर यांच्यामध्ये शक्ती प्राप्त झाली.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options