Skip to content
1 शमुवेल २५:४-१७

नाबाल दावीदाचा अपमान करतो

1 शमुवेल २५:४-१७
आणि नाबाल मेंढरांची कातरणी करीत आहे असे दावीदाने रानात ऐकले.
तेव्हा दावीदाने दहा तरुण पुरुष पाठवित म्हटले, “कर्मेल येथे नाबालकडे जा आणि माझ्या नावाने त्याला अभिवादन करा.
त्याला म्हणा, ‘चिरकाळ जग! तुला, तुझ्या घराण्याला व सर्व जे तुझे आहे त्यांना चांगली स्वस्थता लाभो!
“ ‘मी ऐकत आहे की, ही मेंढरे कातरण्याची वेळ आहे. जेव्हा तुझे मेंढपाळ आमच्याबरोबर होते, आम्ही त्यांच्याशी वाईट वागलो नाही आणि जितका काळ ते कर्मेल येथे होते त्यांचे काहीही हरवले नाही.
आपल्या चाकरांना ते विचार आणि ते तुला सांगतील. म्हणून आता माझ्या माणसांवर कृपादृष्टी कर, कारण आम्ही सणाच्या वेळेस आलो आहोत, तर कृपा करून जे काही तुझ्या हाती येईल ते तुझ्या सेवकांना आणि तुझा पुत्र दावीद यांना दे.’ ”
जेव्हा दावीदाची माणसे तिथे आली, त्यांनी दावीदाच्या नावाने हा निरोप नाबालास दिला व ते वाट पाहत राहिले.
१०
नाबालने दावीदाच्या सेवकांना उत्तर दिले, “कोण हा दावीद? कोण हा इशायाचा पुत्र? आजकाल पुष्कळ सेवक त्यांच्या मालकांपासून पळून जात आहेत.
११
जी भाकर व जे पाणी आणि जे मांस मी माझी मेंढरे कातरणार्‍यांसाठी कापून ठेवले आहे ते, जी माणसे कुठून आली हे मला माहीत नाही अशांना द्यावे काय?”
१२
तेव्हा दावीदाची माणसे परत त्यांच्या वाटेने गेली. आणि पोहोचल्यावर प्रत्येक शब्दाचा अहवाल दावीदाला दिला.
१३
तेव्हा दावीद त्याच्या माणसांना म्हणाला, “प्रत्येकाने आपली तलवार कंबरेस बांधा,” आणि त्यांनी तसे केले आणि दावीदानेसुद्धा त्याची तलवार कंबरेस बांधली. सुमारे चारशे पुरुष दावीदाबरोबर गेले आणि दोनशे पुरुष सामानाजवळ राहिले.
१४
चाकरांपैकी एकाने नाबालाची पत्नी अबीगईल हिला सांगितले, “दावीदाने रानातून आपल्या धन्याला अभिवादन देण्यासाठी निरोप्यांना पाठविले, परंतु त्यांनी त्यांचा अपमान केला.
१५
तरीही ही माणसे आमच्याबरोबर चांगलीच होती. ते आमच्याशी वाईट वागले नाहीत आणि संपूर्ण वेळ आम्ही शेतामध्ये त्यांच्याजवळ होतो तेव्हा आमचे काहीही हरवले नाही.
१६
जेव्हा आम्ही आमची मेंढरे त्यांच्याबरोबर राखीत होतो, तेव्हा रात्रंदिवस ते भिंतीसारखे आमच्या सभोवती होते.
१७
आता काय करावे याचा तुम्ही विचार करा, कारण आमच्या मालकावर आणि त्यांच्या संपूर्ण घराण्यावर संकट येत आहे. ते इतके दुष्ट मनुष्य आहेत की, त्यांच्याबरोबर बोलण्यास कोणी धजत नाही.”
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options