Skip to content
1 शमुवेल १५:१५-२४

1 शमुवेल १५:१५-२४

१५
शौलाने उत्तर दिले, “सैन्याच्या लोकांनी ती अमालेक्यांपासून आणली आहेत; त्यांनी उत्तम मेंढरे व गुरे याहवेह तुमचा परमेश्वर यांच्या यज्ञासाठी राखून ठेवले आहेत, परंतु बाकीच्या सर्वांचा आम्ही पूर्णपणे नाश केला आहे.”
१६
तेव्हा शमुवेल शौलास म्हणाले, “पुरे! काल रात्री याहवेहने मला काय सांगितले ते मी तुला सांगतो.” “सांगा,” शौल म्हणाला.
१७
शमुवेल म्हणाले, “एकेकाळी तू आपल्याच दृष्टीने लहान होतास, तरी इस्राएलच्या गोत्रांचा पुढारी तू झाला नाहीस काय? याहवेहने तुला इस्राएलचा राजा म्हणून अभिषेक केला.
१८
आणि याहवेहने तुला एका कामगिरीवर पाठवित म्हटले, ‘जा आणि त्या दुष्ट अमालेक्यांचा पूर्णपणे नाश कर, ते नाहीसे होईपर्यंत त्यांच्याविरुद्ध युद्ध कर.’
१९
तू याहवेहच्या आज्ञेचे पालन का केले नाहीस? लुटीवर झडप घालून तू याहवेहच्या दृष्टीने जे वाईट ते का केलेस?”
२०
शौल शमुवेलला म्हणाला, “पण मी याहवेहचे आज्ञापालन केले, याहवेहने मला दिलेल्या कामगिरीवर मी गेलो, अमालेक्यांचा मी पूर्णपणे नाश केला आणि अगाग त्यांचा राजा याला मी घेऊन आलो.
२१
सैनिकांनी त्या लुटीतील मेंढरे व गुरे घेतली व त्यातील जे उत्तम ते गिलगालात याहवेह तुमचे परमेश्वर यांच्यासाठी यज्ञ करावे म्हणून राखून ठेवली आहेत.”
२२
परंतु शमुवेलने उत्तर दिले: “त्यांच्या आज्ञा पाळल्याने याहवेहला जितका होतो तितका आनंद होमार्पणे व यज्ञांनी होईल काय? यज्ञापेक्षा आज्ञापालन चांगले, आणि एडक्याच्या चरबीपेक्षा वचन ऐकणे बरे.
२३
कारण बंडखोरी ही शकुनविद्येच्या पापासारखी आहे, आणि हट्टीपणा मूर्तिपूजेसारखा वाईट आहे. तू याहवेहचे वचन धिक्कारले यामुळे, त्यांनी तुला राजा म्हणून धिक्कारले आहे.”
२४
शौल शमुवेलास म्हणाला, “मी पाप केले आहे, मी याहवेहच्या आज्ञेचा व तुमच्या सूचनांचा भंग केला आहे; मला लोकांचे भय वाटले, म्हणून मी त्यांचे म्हणणे ऐकले.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options