मुख्य मजकुरावर जा
1 शमुवेल १०:९-१६

संदेष्ट्यांची चिन्हे पूर्ण होतात

1 शमुवेल १०:९-१६
शमुवेलपासून निघून जाण्यासाठी शौल वळताच, परमेश्वराने शौलाचे हृदय बदलले आणि त्याच दिवशी ही सर्व चिन्हे पूर्ण झाली.
१०
जेव्हा शौल आणि त्याचा सेवक गिबियाहकडे आले तेव्हा संदेष्ट्यांची मिरवणूक त्याला भेटली; तेव्हा परमेश्वराचा आत्मा सामर्थ्याने त्याच्यावर उतरला आणि तो त्यांच्याबरोबर भविष्यवाणी करू लागला.
११
सर्व लोक जे शौलाला पूर्वीपासून ओळखीत होते, जेव्हा त्यांनी त्याला संदेष्ट्यांबरोबर भविष्यवाणी करताना पाहिले, तेव्हा ते आपसात म्हणू लागले, “कीशच्या मुलाला हे काय झाले आहे? शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी एक आहे काय?”
१२
तिथे राहत असलेल्या एका मनुष्याने उत्तर दिले, “त्यांचा पिता कोण आहे?” यावरून अशी म्हण पडली: “शौलसुद्धा संदेष्ट्यांपैकी आहे काय?”
१३
शौलाने भविष्यवाणी करण्याचे थांबविल्यानंतर तो उच्चस्थानी गेला.
१४
तेव्हा शौलाच्या काकाने त्याला आणि त्याच्या सेवकाला विचारले, “तुम्ही कुठे गेला होता?” तो म्हणाला, “गाढवांना शोधण्यासाठी गेलो होतो, परंतु ती आम्हाला सापडत नाहीत असे पाहून, आम्ही शमुवेलकडे गेलो.”
१५
शौलाचे काका म्हणाले, “शमुवेल तुला काय म्हणाले ते मला सांग.”
१६
शौलाने उत्तर दिले, “गाढवे सापडली आहेत याची त्यांनी आम्हाला खात्री दिली.” परंतु राजपदाबद्दल शमुवेलने जे सांगितले होते ते त्याने त्याच्या काकांना सांगितले नाही.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options