Skip to content

Winter बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 14 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

  2. पृथ्वीच्या सर्व सीमा तुम्हीच निर्धारित केल्या आहेत; उन्हाळा आणि हिवाळादेखील तुम्हीच निर्माण केले आहे.

  3. आळशी निर्धारित ऋतूमध्ये नांगरणी करीत नाहीत; म्हणून हंगामाच्या वेळी शोधून त्यांना काहीही मिळणार नाही.

  4. पाहा! हिवाळा संपला आहे; आता पाऊससुद्धा होऊन गेला.

  5. हा नववा महिना असून राजा राजवाड्याच्या एका खास हिवाळी दालनात शेगडी पुढे घेऊन शेकत बसला होता.

  6. मी ग्रीष्मकालीनघर आणि उष्मकालीनघर पाडून टाकेन; हस्तिदंताने सजविलेल्या घरांचा विध्वंस होईल भवने जमीनदोस्त होतील,” असे याहवेह जाहीर करतात.

  7. तुमच्या पलायनाचा काळ हिवाळ्यात किंवा शब्बाथ दिवशी येऊ नये म्हणून प्रार्थना करा.

  8. ते थंडीचे दिवस होते आणि यरुशलेमात मंदिराच्या समर्पणाचा सण होता.

  9. बराच वेळ व्यर्थ गेलेला होता आणि समुद्रावरून जाणे धोक्याचे झाले होते आणि आता प्रायश्चित्ताचा दिवस होऊन गेला होता. तेव्हा पौलाने अधिकार्‍यांना इशारा दिला,

  10. कारण हे बंदर खुले असून हिवाळा घालविण्यासाठी सुरक्षित नव्हते, म्हणून बहुतेकांनी सल्ला दिला की, प्रवास पुढे चालू ठेवावा आणि जमल्यास फेनिके बंदरात जाऊन तिथे हिवाळा घालवावा. ते बंदर क्रेता या ठिकाणी होते, दक्षिण-पश्चिम आणि उत्तर-पश्चिम अशा दोन्ही दिशांकडे या बंदराचे तोंड होते.

  11. तीन महिन्यानंतर आलेक्सांद्रियाचे जहाज हिवाळ्यासाठी थांबले होते त्याने आम्ही प्रवास सुरू केला. त्यावर त्याची निशाणी क्यास्टर व पोलक या जुळ्या दैवतांची मूर्ती बसवलेली होती.

  12. हिवाळ्यापूर्वी इकडे येण्याचा प्रयत्न कर. युबूल, पुदेस, लीन, क्लौदिया आणि इतर सर्वजण तुला शुभेच्छा पाठवितात.

  13. अर्तमाला किंवा तुखिकाला मी तुझ्याकडे पाठविल्यानंतर शक्य तितक्या लवकर तू मला निकोपोलीस येथे येऊन भेट, कारण मी हिवाळ्यात तिथेच राहण्याचा निश्चय केला आहे.