Skip to content

Whoredom बद्दल बायबलमधील वचने: Figurative

6 वचने · 2 पैलू

Figurative बद्दल वचने

  1. पीडांची वाटी ओतणार्‍या त्या सात देवदूतांपैकी एक देवदूत माझ्याकडे आला व मला म्हणाला, “माझ्याबरोबर ये, म्हणजे मी तुला अनेक जलप्रवाहांवर बसलेल्या त्या मोठ्या वेश्येचा न्याय कसा होणार आहे ते दाखवेन.

  2. पृथ्वीवरील राजांनी तिच्याशी व्यभिचार केला आणि पृथ्वीवरील लोक त्यांच्या जारकर्माचे मद्य पिऊन झिंगले.”

  3. नंतर मी आत्म्याने संचरित असताना देवदूताने मला रानात नेले. तिथे किरमिजी रंगाचे श्वापद व त्यावर परमेश्वर निंदात्मक नावे असून त्याला सात डोकी व दहा शिंगे होती व एक स्त्री त्यावर बसलेली मला दिसली.

  4. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे घातली होती आणि सोने, मौल्यवान रत्ने व मोती यांनी ती शृंगारलेली होती. तिच्या हातात अमंगळ पदार्थांनी आणि तिच्या जारकर्मांच्या अशुद्धतेने भरलेला सोन्याचा प्याला होता.

  5. तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक गूढ अर्थाचे होते: महान बाबिलोन, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची माता.

  6. मी बघितले की येशूंसाठी हुतात्मे झालेल्या पवित्र लोकांचे रक्त पिऊन ती झिंगली होती. अचंबित होऊन मी तिच्याकडे पाहत राहिलो.