मुख्य मजकुरावर जा

Weeks बद्दल बायबलमधील वचने: A space of seven years sometimes so called

5 वचने · 4 पैलू

A space of seven years sometimes so called बद्दल वचने

  1. लग्नाचा सप्ताह पूर्ण होऊ दे, मग माझ्यासाठी आणखी सात वर्षे काम करण्याचे तू वचन देत असशील तर राहेलही तुला मिळेल.”

  2. याकोबाने त्याप्रमाणे केले. त्याने लेआसोबत संपूर्ण एक आठवडा घालविला, मग लाबानाने त्याला त्याची कन्या राहेल ही पत्नी म्हणून दिली.

  3. “तुमचे लोक आणि तुमचे पवित्र शहर यासाठी सत्तर ‘सप्तके’ निर्धारित केली गेली आहे की त्यांनी अपराधाचा अंत करावा आणि पापाचा शेवट करावा आणि दुष्टतेसाठी पश्चात्ताप करावा, सनातन नीतिमत्व आणावे, दृष्टान्त आणि संदेश यावर शिक्कामोर्तब करण्यासाठी आणि परमपवित्रस्थानाला अभिषेक करण्यात यावा.

  4. “हे जाणा आणि समजून घ्या: यरुशलेमची पुनर्स्थापना आणि पुनर्बांधणी करण्यासाठी सात ‘सप्तके’ आणि बासष्ट ‘सप्तके’ निश्चित केली आहेत. ते शब्द बाहेर येण्यापासून तो अभिषिक्त शासनकर्ता होईपर्यंतचा वेळ ठरविला आहे. अडचणीच्या वेळी रस्त्यावर आणि खंदकाने पुन्हा बांधले जाईल,

  5. तो एका ‘सप्तका’ साठी अनेकांसोबत कराराची पुष्टी करेल. ‘सप्तका’ मध्ये, यज्ञ करण्यास व अन्नार्पणे वाहण्याचे बंद करेल. आणि मंदिरात अमंगळ वस्तू स्थापित करेल, ज्यामुळे ओसाडी पडेल. नेमलेल्या समाप्तीपर्यंत सर्वनाश करणार्‍यावर कोपाचा वर्षाव होईल.”