Skip to content

Usury बद्दल बायबलमधील वचने: Forbidden

12 वचने · 5 पैलू

Forbidden बद्दल वचने

  1. “तुमच्यामध्ये असलेल्या माझ्या गरजवंत लोकांना जर तुम्ही उसने पैसे दिले, तर त्यांच्याशी सावकारी व्यवहार करू नका; व व्याज लावू नका.

  2. “ ‘जर तुमच्या कोणी इस्राएल बंधूला दारिद्र्य आले आणि ते तुमच्यामध्ये स्वतःचे पालनपोषण करू शकत नसतील, तर जसे तुम्ही परदेशी आणि परक्यांना मदत कराल तशी त्यांना करा, जेणेकरून ते तुमच्यामध्ये राहतील.

  3. परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.

  4. तुम्ही त्यांना व्याजाने पैसे देऊ नयेत किंवा जे खाद्यपदार्थ तुम्ही त्यांना विकाल त्यावर नफा घेऊ नये.

  5. तुमच्या इस्राएली बंधूला दिलेल्या कर्जावर व्याज मागू नका, मग ते कर्ज पैशाच्या, अन्नाच्या अथवा दुसर्‍या कशाच्याही रूपाने दिलेले असो, त्याच्यावर व्याज मागू नका.

  6. जो व्याज न आकारता पैसे उसने देतो; जो निष्पाप लोकांविरुद्ध साक्ष देण्यासाठी लाच घेत नाही, जो कोणी या गोष्टी करतो तो कधीही ढळणार नाही.

  7. जो गरिबांकडून व्याज किंवा फायदा घेऊन संपत्ती वाढवितो, ती दुसर्‍याकरिता साठवितो, जो गरिबांवर दया दाखवेल.

  8. हे माझ्या आई, हाय हाय, तू मला जन्म दिला, मी या सर्व राष्ट्राच्या दृष्टीने झगडा आणि विद्रोह करणारा झालो आहे! मी कोणाही कडून कर्ज घेतलेले नाही, ना कोणी माझ्याकडून घेतलेले आहे, तरीपण प्रत्येकजण मला श्राप देतात.

  9. व्याजावर कोणाला उसने देत नाही त्यांच्याकडून आपला नफा करून घेत नाही. वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि दोन गटांमधील न्याय सत्याने करतो.

  10. तो व्याजाने उसने देतो आणि नफा घेतो. असा मनुष्य जगेल काय? तो जगणार नाही! कारण त्याने ही सर्व अमंगळ कृत्ये केली आहेत, तो मारला जाईल; आणि त्याचे रक्त त्याच्याच माथ्यावर राहील.

  11. तो गरिबांचे वाईट करण्यापासून आपला हात आवरतो आणि त्यांच्याकडून व्याज किंवा नफा घेत नाही. तो माझे नियम आचरतो व माझे विधी पाळतो. तो आपल्या पित्याच्या पापासाठी मरणार नाही; तर तो खचितच जगेल.

  12. तुझ्यात लोक आहेत, जे रक्तपात करण्यास लाच घेतात; तू व्याज घेते आणि गरिबांकडून नफा करून घेतेस. तू आपल्या शेजार्‍याकडून जबरीने वसूल करून लाभ घेतेस. आणि तुला माझा विसर पडला आहे, असे सार्वभौम याहवेह जाहीर करतात.