Skip to content

Tree बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 4 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. याहवेह परमेश्वराने सर्व प्रकारची झाडे जमिनीतून उगवली—डोळ्यांना आनंद देणारे व खाण्यास उत्तम असलेले जीवनवृक्ष आणि बर्‍यावाईटाचे ज्ञान करून देणारा वृक्ष हे देखील बागेच्या मध्यभागी लावले.

  2. परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करून देणार्‍या वृक्षाचे फळ मात्र तू खाऊ नकोस, कारण ज्या दिवशी तू ते फळ खाशील त्या दिवशी तू निश्चित मरशील.”

  3. पण परमेश्वर म्हणाले, ‘बागेच्या मध्यभागी असलेल्या झाडाचे फळ खाऊ नका आणि त्याला स्पर्शही करू नका, असे केल्यास तू मरशील.’ ”

  4. पण सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही निश्चितच मरणार नाही,

  5. कारण परमेश्वराला हे माहीत आहे की ज्या दिवशी ते फळ तुम्ही खाल, त्या दिवशी तुमचे डोळे उघडतील आणि चांगले व वाईट यातील फरक तुम्हाला समजेल आणि तुम्ही परमेश्वरासारखे व्हाल.”

  6. जेव्हा स्त्रीने पाहिले की खाण्यास योग्य, दिसण्यास सुंदर आणि सुज्ञ करणारे ते झाड आहे, तेव्हा तिने त्याच्या फळातील काही तोडून घेतले आणि खाल्ले आणि आपला पती, जो तिच्यासोबत होता, त्यालाही दिले आणि त्याने ते खाल्ले.

  7. याहवेह म्हणाले, “तू नग्न आहेस हे तुला कोणी सांगितले? ज्या झाडाचे फळ खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, त्या झाडाचे फळ तू खाल्लेस काय?”

  8. त्यावर आदाम म्हणाला, “जी स्त्री तुम्ही माझ्या सोबतीला दिली; तिने मला त्या झाडाची फळे दिली आणि मी ती खाल्ली.”

  9. नंतर ते आदामाला म्हणाले, “तू तुझ्या पत्नीचे ऐकलेस आणि ज्या झाडाचे फळ तू खाऊ नकोस, अशी मी तुला आज्ञा केली होती, ते खाल्लेस म्हणून आता, “तुझ्यामुळे भूमी शापित झाली आहे; तू तुझ्या आयुष्याचे सर्व दिवस अत्यंत क्लेशमय कष्ट करून तिचा उपज खाशील.

  10. नंतर याहवेह परमेश्वर म्हणाले, “पाहा, मानव आपल्यापैकी एक आणि आपल्यासारखा झाला आहे; तो बरे आणि वाईट यातील फरक समजू लागला आहे. परंतु आता जीवनवृक्षाचे फळ त्याच्या हाती लागून त्याने ते तोडून खाऊ नये, कारण मग तो सदासर्वकाळ जिवंत राहील.”

  11. अशा रीतीने त्यांनी मनुष्याला एदेन बागेच्या बाहेर घालवून दिले आणि जीवनवृक्षाकडे कोणीही जाऊ नये यासाठी एदेन बागेच्या पूर्वेस करूबीम आणि प्रत्येक दिशेकडे फिरणारी एक ज्वालामय तलवार ठेवली.

  12. ते अशा वृक्षासारखे आहेत जे सतत वाहणार्‍या जलप्रवाहाजवळ लावलेले असते, जे आपल्या ऋतूमध्ये फळ देते आणि ज्यांची पाने कोमेजत नाहीत. त्यांनी हाती घेतलेले प्रत्येक काम सिद्धीस जाते.

  13. ते पाण्याच्या जवळ लावलेल्या झाडासारखे आहेत. त्याची मुळे खोलवर पाण्यात गेलेली असतात. या झाडाला उष्णतेचे भय वाटत नाही; त्याची पाने सदा हिरवी राहतात. अवर्षणाच्या वर्षांची त्याला काळजी वाटत नाही. आणि ते आपली रसाळ फळे देण्याचे कधीच थांबत नाही.”

  14. मी माझ्या बिछान्यावर निजलेला असताना हे दृष्टान्त पाहिले: पृथ्वीच्या मध्यभागी एक वृक्ष लावलेला मी पाहिले. तो प्रचंड उंचच उंच होता.

  15. तो वृक्ष वाढला आणि मजबूत झाला आणि त्याचा शेंडा आकाशापर्यंत पोहोचला; पृथ्वीच्या सीमेपासूनही तो दिसू शकत होता.

  16. त्याची पाने हिरवीगार होती, त्याला फळे भरपूर होती आणि त्यामध्ये प्रत्येकासाठी भोजन होते. त्याच्या खाली जंगली पशू विसावले होते, आणि त्याच्या फांद्यांमध्ये पक्षी राहत असत; त्यांनी आपली घरटी बांधली. त्यातून प्रत्येक प्राण्याला खायला मिळत असे.

  17. “आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत प्रवेश मिळावा म्हणून जे आपली वस्त्रे धुतात ते धन्य.