Treasure बद्दल बायबलमधील वचने: Jesus forbids the hoarding of
Jesus forbids the hoarding of बद्दल वचने
“तुमची धनसंपत्ती तुम्ही पृथ्वीवर साठवून ठेवू नका, कारण तिथे तिला कसर लागून, गंजून तिचा नाश होतो. शिवाय चोरही ती लुटून नेतात.
येशू म्हणाले, “तू परिपूर्ण होऊ इच्छित असल्यास जा, तुझी मालमत्ता विकून टाक आणि गरिबांना वाटून दे आणि तुला स्वर्गात संपत्ती मिळेल. मग ये व मला अनुसर.”
तुमची मालमत्ता विका आणि गरिबांना द्या. कधीही जीर्ण होणार नाही अशा पिशव्या स्वतःसाठी घ्या, वर स्वर्गामध्ये नष्ट न होणारा खजिना ठेवा, जिथे कोणी चोर येणार नाही की त्याला कसरही लागणार नाही.