मुख्य मजकुरावर जा

The Tribe Of Dan बद्दल बायबलमधील वचने: Tool Laish and called it Dan

9 वचने · 23 पैलू

Tool Laish and called it Dan बद्दल वचने

  1. जेव्हा ते हेर सोराह व एष्टाओल येथे परतले, त्यांच्या दान भाऊबंदांनी त्यांना विचारले, “तुम्ही काय माहिती आणली आहे?”

  2. त्यांनी उत्तर दिले, “चला, आपण त्यांच्यावर हल्ला करू! आम्ही तो देश पाहिला आहे आणि तो खूप चांगला आहे. तुम्ही काही करणार नाही का? तिथे जाऊन ते ताब्यात घेण्यास अजिबात संकोच करू नका.

  3. जेव्हा तुम्ही तिथे पोहोचाल, तेव्हा तुम्हाला एक संशयहीन लोक आणि परमेश्वराने तुमच्या हातात दिलेली सुरक्षित प्रशस्त भूमी सापडेल, अशी भूमी जिथे कशाचीही कमतरता नाही.”

  4. तेव्हा दान गोत्राचे सहाशे सैनिक सोराह व एष्टाओल येथून निघाले.

  5. त्यांनी जाताना यहूदीयातील किर्याथ-यआरीम जवळ तळ दिला, यामुळे या ठिकाणाला आज देखील “महाने-दान” असेच म्हणतात.

  6. तिथून ते एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशात गेले आणि मीखाहच्या घरी आले.

  7. मग मीखाहने जे बनविले होते आणि त्याच्या पुरोहितासह दानचे लोक लईश या शहरात येऊन दाखल झाले. तेथील लोक शांत आणि सुरक्षित होते. त्यांनी त्यांच्यावर तलवारीने हल्ला केला आणि त्यांचे शहर जाळून टाकले.

  8. त्यांना वाचविणारा कोणी नव्हता, कारण ते सीदोनापासून दूर राहत होते आणि त्यांचा इतर लोकांशी कसलाही व्यवहार नव्हता. हे शहर बेथ-रहोब शेजारी असलेल्या खोर्‍यात होते. मग दानच्या लोकांनी ते शहर पुन्हा बांधले आणि ते तिथे राहू लागले.

  9. त्यांनी त्या शहरास आपला पूर्वज, इस्राएलचा एक पुत्र दान त्याचे नाव दिले—त्या शहराचे मूळ नाव लईश होते.