The Sabbath बद्दल बायबलमधील वचने: Punishment of those who profane
Punishment of those who profane बद्दल वचने
“ ‘शब्बाथ दिवस पाळावा, कारण तो तुम्हासाठी पवित्र आहे; जो कोणी तो अपवित्र करेल त्याला जिवे मारावे; जे कोणी त्या दिवशी काम करतील, त्यांना त्यांच्या लोकांतून काढून टाकले जावे.
सहा दिवस काम करावे, परंतु सातवा दिवस हा विसाव्याचा शब्बाथ आणि याहवेहसाठी पवित्र आहे; शब्बाथ दिवशी जो काम करेल त्याला जिवे मारावे.
इस्राएली लोक रानात असताना, एक मनुष्य शब्बाथ दिवशी लाकडे गोळा करीत असताना सापडला.
तेव्हा ज्यांनी त्याला लाकडे गोळा करताना पकडले, त्यांनी त्याला मोशे, अहरोन व सर्व मंडळीसमोर आणले,
आणि त्यांनी त्याला ताब्यात ठेवले, कारण त्याचे काय करावे याविषयी त्यांना काही स्पष्ट माहीत नव्हते.
मग याहवेह मोशेला म्हणाले, “त्या मनुष्याने मरावे. सर्व मंडळीने त्याला छावणीबाहेर धोंडमार करावा.”
मग मोशेला याहवेहने दिलेल्या आज्ञेप्रमाणे मंडळीने त्याला छावणीबाहेर नेऊन तो मरेपर्यंत धोंडमार केली.