मुख्य मजकुरावर जा

The Oak Tree बद्दल बायबलमधील वचने: Performed idolatrous rites under

4 वचने · 16 पैलू

Performed idolatrous rites under बद्दल वचने

  1. “ज्यांच्यामध्ये तुम्ही हर्षोत्सव केले, त्या एलाच्या पवित्र वृक्षाबद्दल तुम्ही लज्जित व्हाल; ज्यांची तुम्ही निवड केली आहे त्या बागांमुळे तुमचा अपमान केला जाईल.

  2. एला वृक्षाच्या झाडीत आणि प्रत्येक घनदाट वृक्षाच्या सावलीत तुम्ही कामांध होता; खोल दर्‍यात, खडकांच्या कड्याखाली नरबळी म्हणून आपल्या लेकरांचे बळी देता.

  3. त्यांच्या मूर्तीसमोर, त्यांच्या वेद्यांभोवती, प्रत्येक उंच टेकड्यांवर व सर्व डोंगरमाथ्यांवर, प्रत्येक गडद सावलीच्या झाडाखाली आणि दाट पाने असलेल्या प्रत्येक एला वृक्षाखाली; ज्या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सर्व मूर्तींना सुवासिक धूप अर्पण केले, जेव्हा त्यांचे लोक तिथेच पडतील, तेव्हा ते जाणतील की मीच याहवेह आहे.

  4. एला वृक्ष, हिवर आणि एला या झाडांखाली, जिथे सुखदायक सावली असते तिथे पर्वतांच्या शिखरांवर यज्ञ करतात आणि टेकड्यांवर ते होमार्पण करतात. म्हणून तुमच्या कन्या वेश्याव्यवसायाकडे वळतात आणि तुमच्या सुना व्यभिचार करतात.