मुख्य मजकुरावर जा

The Emblems of the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

14 वचने · 29 पैलू

"The Emblems of the Holy Spirit" साठी शोधा

प्रमुख बायबल वचने

  1. येशू आणखी म्हणाले, “परमेश्वराचे राज्य असे आहे. एक मनुष्य जमिनीवर बी विखरतो.

  2. रात्र आणि दिवस, तो झोपतो किंवा उठतो, इकडे बी उगवते आणि कसे वाढते, ते त्याला कळतही नाही.

  3. कारण जमीन स्वतः पीक उत्पन्न करते—पहिल्यांदा अंकुर, कणसे आणि मग कणसात दाणे भरतात.

  4. जेव्हा त्यांनी तो मोठा आवाज ऐकला, तेव्हा त्या ठिकाणी लोकांची मोठी गर्दी जमली आणि ते गोंधळून गेले, कारण प्रत्येकाने स्वतःची मातृभाषा बोलली जात असलेली ऐकले.

  5. विस्मित होऊन त्यांनी विचारले: “हे सर्व बोलत आहेत ते गालीलकर आहेत ना?

  6. तरीसुद्धा ते आमच्या मातृभाषांमध्ये बोलताना आम्ही ऐकत आहोत हे कसे?

  7. आम्ही येथे पार्थी, मेदिया आणि एलामी लोक आहोत; मेसोपोटामिया रहिवासी, यहूदीया आणि कप्पदुकिया, पंत आणि आशिया,

  8. फ्रुगिया आणि पंफुल्या, इजिप्त व कुरणेच्या जवळचा लिबिया; रोमहून आलेले पाहुणे

  9. यहूदी व धर्मांतर झालेले यहूदी; क्रेतीय व अरब लोक हे देखील आमच्यात आहेत. तरी देखील परमेश्वराच्या अद्भुत कृत्यांबद्दल आमच्या भाषेमध्ये बोलताना ऐकत आहोत!”

  10. ज्याप्रकारे पवित्र आत्मा म्हणतो: “आज, जर तुम्ही त्यांची वाणी ऐकाल,

  11. तर तुमची अंतःकरणे कठीण करू नका, जशी रानात परीक्षा होत असताना तुम्ही बंडखोरी केली होती.

  12. जरी त्यांनी माझी कृत्ये चाळीस वर्षे पाहिली होती तरी तुमच्या पूर्वजांनी माझी परीक्षा घेऊन मला कसोटीस लावले.

  13. आणि म्हणून त्या पिढीवर मी फार संतापलो; मी म्हणालो, ‘त्यांची हृदये माझ्यापासून नेहमीच दूर जात आहेत, आणि त्यांना माझे मार्ग कळलेच नाही.

  14. मी रागाने शपथ घेतली की, ते माझ्या विसाव्यात कधीही प्रवेश करणार नाहीत.’ ”