Skip to content

Skepticism बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. यावर फारोह म्हणाला, “हा याहवेह कोण आहे, की मी त्याचे ऐकावे व इस्राएली लोकांना जाऊ द्यावे? मी याहवेहला ओळखत नाही. मी इस्राएलला जाऊ देणार नाही.”

  2. हा सर्वसमर्थ कोण आहे, की आम्ही त्यांची सेवा करावी? त्यांच्याकडे विनंती करून आम्हाला काय मिळणार?’

  3. ते परमेश्वराला म्हणाले, ‘तुम्ही येथून निघून जा! सर्वसमर्थ आमच्यासाठी काय करणार?’

  4. संगीत दिग्दर्शकासाठी. दावीदाचे स्तोत्र. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर नाही.” ते बहकलेले असून त्यांची कृत्ये दुष्ट आहेत, सत्कर्म करणारा कोणी नाही.

  5. संगीत दिग्दर्शकासाठी. माहलथवर आधारित, दावीदाचे मासकील. मूर्ख आपल्या मनात म्हणतो, “परमेश्वर अस्तित्वात नाही.” ते बहकलेले आहेत आणि त्यांची कृत्ये दुष्टच समजावी, कारण सत्कर्म करणारा कोणी नाही.

  6. त्या समयी मी दिवा घेऊन यरुशलेममध्ये शोधेन आणि जे बेफिकीर असतात, जे पखालीत सोडलेल्या द्राक्षारसाच्या गाळासारखे आहेत, जे विचार करतात की याहवेह आपले बरे किंवा वाईट असे काहीही करणार नाहीत, अशांना शिक्षा करेन.

  7. “तुम्ही असे म्हणाला, ‘परमेश्वराची सेवा करणे व्यर्थ आहे. त्यांचे सर्व विधिनियम पाळण्याने किंवा सर्वसमर्थ याहवेहपुढे शोक करण्याऱ्यासारखे जाण्याने आम्हाला काय मिळते?

  8. इतर शिष्य त्याला सांगू लागले, “आम्ही प्रभूला पाहिले!” परंतु तो त्यांना म्हणाला, “त्यांच्या हातात खिळ्यांचे व्रण पाहिल्यावाचून व जिथे खिळे ठोकले होते तिथे माझे बोट घातल्यावाचून आणि माझा हात त्यांच्या कुशीत घातल्यावाचून मी विश्वास ठेवणार नाही.”

  9. एक आठवड्यानंतर शिष्य पुन्हा घरी असताना थोमा त्यांच्याबरोबर होता. जरी दारे बंद होती तरी येशू त्यांच्यामध्ये उभे राहून म्हणाले, “तुम्हाला शांती असो!”

  10. नंतर त्यांनी थोमाला म्हटले, “तुझे बोट येथे ठेव; माझे हात पाहा. तुझा हात लांब कर आणि माझ्या कुशीत घाल. विश्वासहीन न राहता विश्वास धरणारा हो.”

  11. थोमाने म्हटले, “माझे प्रभू व माझे परमेश्वर!”