Skip to content

Seasons बद्दल बायबलमधील वचने

10 वचने

प्रमुख बायबल वचने

  1. त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.

  2. “पृथ्वी अस्तित्वात आहे, तोपर्यंत वसंतॠतू व हंगामाचा काळ, थंडी व उष्णता, हिवाळा व उन्हाळा, दिवस व रात्र ही व्हावयाची थांबणार नाहीत.”

  3. त्यांनी ऋतुंची नोंद करण्यासाठी चंद्राची निर्मिती केली, आणि सूर्यास कधी अस्त व्हावे हे ठाऊक आहे.

  4. “याहवेह असे म्हणतात, ‘मी दिवसाशी केलेला करार व रात्रीशी केलेला करार तुम्ही मोडू शकला, तर दिवस व रात्र योग्य समयी येणार नाहीत,

  5. ते समय व ॠतू बदलतात; ते राजांना पदच्युत करतात व इतरांना उंच करतात. शहाण्यांना तेच शहाणपण देतात, सुज्ञांना बुध्दीही देतात.

  6. त्यांनी उत्तर दिले, “तो या दुष्ट लोकांना ठार करेल आणि जे त्याला हंगामाच्या वेळी फळ देतील, अशा दुसर्‍या शेतकर्‍यांना तो द्राक्षमळा भाड्याने देईल.”

  7. “आता अंजिराच्या झाडापासून हा बोध घ्या व शिका. त्या झाडाच्या डाहळ्या कोवळ्या झाल्या आणि त्यांना पालवी फुटू लागली म्हणजे उन्हाळा जवळ आला आहे, हे तुम्ही ओळखता.

  8. हंगामाचे दिवस आल्यावर द्राक्षमळ्यातील फळातून काही मिळावे म्हणून त्याने आपला एक सेवक शेतकर्‍यांकडे पाठविला.

  9. ते त्यांना म्हणाले, “पित्याने वेळ व तारीख आपल्या अधिकाराने निश्चित केली आहे आणि त्याबद्दल तुम्हाला जाणून घेण्याची गरज नाही.

  10. आता, बंधू आणि भगिनींनो, वेळ आणि घटका याविषयी तुम्हाला लिहिण्याची गरज नाही,