Skip to content

Sanctuary बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 7 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “मग मी त्यांच्यामध्ये वस्ती करावी, म्हणून त्यांनी माझ्यासाठी एक पवित्रस्थान बनवावे.

  2. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात त्याच्याबाहेर, अहरोन आणि त्याच्या पुत्रांनी याहवेहसमोर संध्याकाळपासून सकाळपर्यंत दिवे पेटत ठेवावे. इस्राएलात हा विधी पिढ्यान् पिढ्या असावा.”

  3. “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे.

  4. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा.

  5. “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.

  6. “पवित्रस्थान व वेदीच्या सेवेसंबंधी तू जबाबदार असावे, यासाठी की इस्राएली लोकांवर माझा क्रोध पुन्हा भडकू नये.

  7. प्रभूने आपल्या वेदीस नाकारले आहे आणि त्यांच्या पवित्रस्थानाचा त्याग केला आहे. त्यांनी तिच्या राजवाड्यांच्या भिंती तिच्या शत्रूंच्या हातात दिल्या आहेत; एका निर्धारित उत्सवाच्या दिवसात करण्याचा जयघोष याहवेहच्या भवनात त्यांच्या शत्रूंनी केला आहे.

  8. याहवेह, बघा व विचार करा: तुम्ही कधी तरी कोणालाही असे वागविले आहे का? ज्या मातांनी आपल्या मुलांचे संगोपन केले, त्या मातांनी ही आपली पोटची फळे खावीत काय? प्रभूच्या मंदिरातच त्यांचे याजक आणि संदेष्ट्यांचा संहार व्हावा काय?

  9. “म्हणून असे म्हण: ‘सार्वभौम याहवेह असे म्हणतात: जरी मी त्यांना राष्ट्रामध्ये दूर पाठवले आणि त्यांना देशांमध्ये पांगविले, तरीही ज्या देशांमध्ये ते गेले आहेत तिथे काही काळासाठी मी त्यांचे पवित्रस्थान होतो.’

  10. याप्रकारे त्याने चारही बाजूंचे माप घेतले. त्याच्याभोवती एक भिंत होती, जी पाचशे हात लांब आणि पाचशे हात रुंद असून पवित्रस्थानाला सर्वसाधारण स्थानापासून वेगळी करीत होती.

  11. प्रभूने उभारलेला खरा मंडप जो केवळ मानवाद्वारे बांधलेला नाही, त्या मंदिरात ते सेवा करीत आहेत.

  12. जे स्वर्गात आहे, त्याचे प्रतिरूप आणि छाया आहे त्या मंदिरात ते सेवा करतात. यामुळेच मोशे निवासमंडप उभारण्याची तयारी करीत असताना, “पर्वतावर दाखविलेल्या निवासमंडपाच्या नमुन्याप्रमाणेच ते सर्व काळजीपूर्वकपणे ठेवावे असे त्याला सांगितले होते.”

  13. एक मंडप तयार केला होता. त्याच्या पहिल्या खोलीत सोन्याचा दीपवृक्ष, एक मेज व त्या मेजावर समर्पित भाकरी होत्या; या भागाला पवित्रस्थान म्हणत.