Skip to content

Prosperity बद्दल बायबलमधील वचने

31 वचने · 8 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. प्रवाशांचे आराधना गीत. जे याहवेहचे भय बाळगतात, आणि त्यांच्या आज्ञा पाळतात, ते धन्य!

  2. तू आपल्या हातांनी केलेल्या श्रमाचे फळ खाशील; तू सुखी होशील व तुझे कल्याण होईल.

  3. जेव्हा वेळ अनुकूल असते तेव्हा आनंद करा; परंतु जेव्हा वेळ प्रतिकूल असते, तेव्हा हे लक्षात घ्या: परमेश्वराने जशी अनुकूल वेळ निर्माण केली तशी प्रतिकूल वेळही त्यांनीच निर्माण केली, म्हणून कोणा व्यक्तीला आपल्या भविष्याबद्दल जाणून घेता येत नाही.

  4. “मी तुम्हाला का क्षमा करू? तुमच्या मुलांनी माझा त्याग केला आहे आणि जे देव नाहीत त्यांची ते शपथ घेऊ लागले आहेत. मी त्यांच्या सर्व गरजांचा पुरवठा केला, तरी त्यांनी व्यभिचार केला वेश्यागृहात गर्दी केली.

  5. जितकी याजकांची संख्या वाढत गेली, तितकी अधिक पापे त्यांनी माझ्याविरुद्ध केली; त्यांच्या वैभवशाली परमेश्वराच्या बदल्यात त्यांनी लाजिरवाणी गोष्ट स्वीकारली.

  6. जेव्हा मी त्यांना भोजन दिले ते तृप्त झाले; जेव्हा ते तृप्त झाले तेव्हा ते गर्विष्ठ झाले; नंतर ते मला विसरले.