Skip to content

Priscilla बद्दल बायबलमधील वचने

10 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. यानंतर, पौलाने ॲथेन्स सोडले व तो करिंथ येथे गेला.

  2. तिथे त्याला पोनतस गावाचा अक्विला नावाचा एक यहूदी भेटला, तो त्याची पत्नी प्रिस्किल्लाला घेऊन इटली देशातून काही दिवसांपूर्वीच तिथे आलेला होता. कारण रोममधून सर्व यहूदी लोकांनी निघून जावे, अशी क्लौडियस सीझरने आज्ञा केली होती. पौल त्यांच्या भेटीला गेला,

  3. जसे ते तंबू तयार करणारे होते तसेच तो देखील होता, मग त्यांच्याबरोबर राहून त्याने काम केले.

  4. पौल करिंथ येथे काही काळ राहिला. नंतर त्याने तेथील विश्वासणार्‍या बंधू व भगिनींचा निरोप घेतला आणि प्रिस्किल्ला व अक्विलाला बरोबर घेऊन तो सीरियाला जाण्यासाठी जलप्रवासास निघाला. परंतु या प्रवासाला निघण्याआधी, किंख्रिया या ठिकाणी पौलाने आपल्या डोक्याचे मुंडण करून घेतले, कारण त्याने नवस केलेला होता.

  5. इफिसमध्ये पोहोचल्यावर, पौलाने प्रिस्किल्ला व अक्विलाला तिथेच सोडले. तो स्वतः तेथील सभागृहामध्ये गेला आणि त्याने तेथील यहूदी लोकांबरोबर युक्तिवाद गेला.

  6. तो धैर्याने सभागृहामध्ये बोलू लागला. जेव्हा प्रिस्किल्ला आणि अक्विला यांनी त्याचा संदेश ऐकला, तेव्हा त्यांनी त्याला त्यांच्या घरी आमंत्रित केले आणि परमेश्वराचा मार्ग त्याला अधिक स्पष्टपणे समजावून सांगितला.

  7. प्रिस्किल्ला व अक्विला ख्रिस्त येशूंमधील माझे सहकारी, यांना सदिच्छा कळवा.

  8. त्यांनी माझ्याकरिता त्यांचा जीवही धोक्यात घातला; आणि केवळ मीच नाही, तर गैरयहूदीयांच्या सर्व मंडळ्याही त्यांचे ऋणी आहेत.

  9. आशिया प्रांतातील मंडळ्या तुम्हाला शुभेच्छा पाठवितात. अक्विला व प्रिस्किल्ला, व त्यांच्या घरात जमणारी मंडळी तुम्हाला प्रभूमध्ये शुभेच्छा सांगतात.

  10. प्रिस्किल्ला, अक्विला आणि अनेसिफराच्या कुटुंबीयांनी माझा सलाम सांग.