मुख्य मजकुरावर जा

Phylactery बद्दल बायबलमधील वचने: A small box containing slips of parchment on which were written portions of the law

9 वचने · 2 पैलू

A small box containing slips of parchment on which were written portions of the law बद्दल वचने

  1. हे तुम्हाला तुमच्या हातावरील खूण व कपाळावर स्मरणचिन्हासारखे असणार. याहवेहचा हा नियम तुमच्या मुखात असावा. कारण याहवेहने आपल्या पराक्रमी हाताने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.

  2. आणि हे तुमच्या हातावर खूण व कपाळावर चिन्ह असे असावे, की याहवेहने आपल्या बलवान हाताने आम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले.”

  3. हे इस्राएला ऐक: याहवेह आपले परमेश्वर एकच याहवेह आहेत.

  4. याहवेह तुमच्या परमेश्वरावर तुमच्या पूर्ण हृदयाने, तुमच्या पूर्ण जिवाने आणि तुमच्या पूर्णशक्तीने प्रीती करा.

  5. या ज्या आज्ञा मी आज तुम्हाला देणार आहे, त्या तुमच्या अंतःकरणात सदैव असाव्या.

  6. त्या तुमच्या मुलांवर बिंबवा. घरी बसले असताना, वाटेवर चालत असताना, झोपण्याच्या वेळी व झोपेतून उठल्यानंतर त्याबद्दल बोलत राहा.

  7. त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.

  8. त्या तुमच्या घरातील दाराच्या चौकटीवर व तुमच्या फाटकांवर लिहा.

  9. यास्तव माझ्या या आज्ञा काळजीपूर्वक आपल्या मनात आणि अंतःकरणात साठवून ठेवा; त्या तुम्ही आपल्या हातावर चिन्ह म्हणून बांधून ठेवा आणि आपल्या कपाळपट्टीवर बांधा.