मुख्य मजकुरावर जा

Pawn बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,

  2. जेव्हा तुम्ही आपल्या शेजार्‍याला काही उसने देता, तर तारण घेण्यासाठी तुम्ही त्याच्या घरात शिरू नये,

  3. तुम्ही बाहेर उभे राहावे आणि ज्या शेजार्‍याला तुम्ही कर्ज देत आहात त्याने तुम्हाला बाहेर तारण आणून द्यावे.

  4. जर शेजारी गरीब असेल, तर तुम्ही त्याने तारण म्हणून दिलेले पांघरूण अंगावर घेऊन झोपू नका.

  5. गहाणादाखल त्याने आपले पांघरूण दिले असेल व तर सूर्यास्तसमयी ते त्याला परत करावे म्हणजे ते पांघरूण अंगावर घेऊन तो झोपेल. तो तुमचे आभार मानेल आणि याहवेह तुमच्या परमेश्वराच्या दृष्टीने तुमचे हे कृत्य नीतिमत्व असे ठरेल.

  6. परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.

  7. अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.

  8. जर तुमच्याकडे कर्ज फेडण्यास पैसे नसतील तर ते तुमचे अंथरूणसुद्धा काढून घेतील.

  9. “समजा एक नीतिमान मनुष्य आहे जो न्याय्य व योग्य आहे तेच करतो जे.

  10. तो कोणावर अत्याचार करीत नाही, तर उसने देताना घेतलेले गहाण परत करतो. जो लुटत नाही तर आपले अन्न भुकेल्यांस देतो आणि वस्त्रहीनांना कपडे पुरवितो.

  11. गरीब व गरजवंतावर तो अत्याचार करतो. तो इतरांना लुटतो. उसने देताना घेतलेले गहाण परत करीत नाही. तो मूर्तींकडे आपली नजर लावतो. तो अमंगळ कृत्ये करतो.

  12. गहाण ठेवलेल्या वस्तू त्यांनी जर परत केल्या, चोरून घेतलेले परत केले, जीवन देणारे नियम पाळले आणि काही वाईट केले नाही; तो व्यक्ती खचित जगेल; ते मरणार नाहीत.

  13. प्रत्येक वेदीजवळ गहाण ठेवलेल्या वस्त्रांवर पडून राहतात आणि आपल्या दैवतांच्या घरात दंड म्हणून घेतलेला द्राक्षारस पितात.