Skip to content

Orphan बद्दल बायबलमधील वचने

49 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “विधवा किंवा अनाथाचा गैरफायदा घेऊ नये.

  2. तुम्ही जर तसे केले आणि त्यांनी माझा धावा केला, तर मी खचितच त्यांचे रडणे ऐकेन.

  3. मग माझा क्रोध पेटेल आणि मी तुम्हाला तलवारीने मारून टाकीन; आणि तुमची पत्नी विधवा व तुमची लेकरे अनाथ होतील.

  4. ते अनाथांचा व विधवांचा न्याय करतात, जे परदेशीय तुम्हामध्ये राहतात त्यांच्यावर प्रीती करून त्यांना अन्न व वस्त्रे देतात.

  5. प्रत्येक तिसर्‍या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,

  6. म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.

  7. याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांनी आपल्या नावासाठी निवडलेल्या पवित्रस्थानी—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी आणि परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  8. आनंदोत्सव साजरा करण्यास—तुम्ही, तुमचे पुत्र व कन्या, तुमचे दास व दासी, तुमच्या नगरातील लेवी, परदेशी, तुमच्यामध्ये राहणारे अनाथ आणि विधवा यांनाही उत्सवात सामील करून घ्यावे.

  9. परदेशी आणि अनाथांना यथायोग्य न्याय दिला पाहिजे, किंवा विधवेची वस्त्रे गहाण म्हणून कधीही घेतली जाऊ नये.

  10. तुम्ही इजिप्त देशात गुलाम होता आणि याहवेह तुमच्या परमेश्वराने त्यातून तुमची सुटका केली, याची तुम्ही सतत आठवण ठेवावी. म्हणूनच मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.

  11. पिकांची कापणी करीत असताना तुम्ही बांधून ठेवलेली एखादी पेंढी शेतातून आणावयाचे विसरलात, तर ती आणण्यासाठी तुम्ही माघारी जाऊ नये, तर परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी ती तिथेच राहू द्यावी, म्हणजे याहवेह तुमचे परमेश्वर तुमच्या हाताच्या सर्व कार्यात आशीर्वाद देतील.

  12. तुम्ही तुमच्या जैतून वृक्षांवरील फळे काढण्याकरिता झोडपणी कराल, तेव्हा तुम्ही एकाच फांदीवर दोनदा प्रहार करू नये. त्या फांदीवर जी काही फळे राहतील ती परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी राहू द्यावी.

  13. जेव्हा तुम्ही तुमच्या द्राक्षमळ्यातील द्राक्षे काढता तेव्हा परत वेलींवर जाऊ नका. तर राहिलेली द्राक्षे परदेशी, अनाथ व विधवा यांच्यासाठी तशीच राहू द्यावीत.

  14. इजिप्त देशामध्ये तुम्ही गुलाम होता याची आठवण ठेवावी म्हणून मी तुम्हाला हे करण्याची आज्ञा देत आहे.

  15. तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशांश तिसर्‍या वर्षी, म्हणजे दशांशाच्या वर्षी लेवी वंशजांना, परदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना द्यावा, म्हणजे तुमच्या नगरात ते खाऊन तृप्त होतील.

  16. मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही.

  17. “जो कोणी परदेशी, अनाथ आणि विधवा यांचा न्याय विपरीत करतो तो शापित होय.” तेव्हा सर्व लोकांनी “आमेन!” म्हणावे.

  18. तुम्ही तर अनाथांवर चिठ्ठ्या टाकण्यास व आपल्या मित्रांची विक्री करण्यास चुकत नाही.

  19. आणि तू विधवांना रिकाम्या हाती घालवून दिले तसेच अनाथांना बलहीन केलेस.

  20. अनाथांची गाढवे ते हाकलून लावतात आणि विधवेचा बैल तारण म्हणून ठेवून घेतात.

  21. पितृहीन बालकांस मातेच्या स्तनापासून ओढून काढले जाते; ऋण फेडून घेण्यासाठी गरिबांची तान्ही बाळे जप्त करतात.

  22. कारण जे गरीब मदतीसाठी याचना करीत आणि ज्या अनाथांच्या मदतीला कोणी नसे, त्यांची मी सुटका केली.

  23. मरत असलेला व्यक्ती मला आशीर्वाद देत असे; आणि विधवांचे हृदय मी आनंदित केले.

  24. “जर मी गरिबांच्या हृदयाच्या इच्छा नाकारल्‍या असतील अथवा विधवांच्या डोळ्यात निराशा येण्याचे कारण झालो असेल,

  25. जर मी माझे अन्न स्‍वतःपाशीच ठेवले, आणि ते मी अनाथांना वाटून दिले नाही—