मुख्य मजकुरावर जा

Offences Against the Holy Spirit बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 12 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. अनेक वर्षे तुम्ही त्यांच्याशी सहनशीलतेने वागलात. तुम्ही आपले संदेष्टे पाठवून त्यांच्या पापांबद्दल त्यांना आत्म्याद्वारे ताकीद दिली. परंतु तरीही त्यांनी दुर्लक्ष केले, तेव्हा तुम्ही शेजारील लोकांच्या हाती त्यांना दिले.

  2. तरीही त्यांनी बंड केले व याहवेहच्या पवित्र आत्म्याला खिन्न केले. म्हणून याहवेह मागे वळले व त्यांचे शत्रू झाले आणि याहवेहने स्वतः त्यांच्याविरुद्ध लढा दिला.

  3. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो, प्रत्येक प्रकारचे पाप किंवा निंदा यांची क्षमा होऊ शकेल, परंतु पवित्र आत्म्याविरुद्ध केलेल्या निंदेची क्षमा होणार नाही.

  4. जो कोणी मानवपुत्राच्या विरुद्ध बोलेल त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्म्याविरुद्ध दुर्भाषण करेल, त्याला या युगात आणि येणार्‍या युगात कधीही क्षमा होणार नाही.

  5. परंतु पेत्र म्हणाला, “हनन्याह, सैतानाने तुझे हृदय एवढे कसे भरले की तू पवित्र आत्म्याशी लबाडी केलीस व मालमत्ता विकून आलेल्या पैशातून काही पैसे तुझ्या स्वतःसाठी ठेवून घेतलेस?

  6. संपत्ती विकण्यापूर्वी ती तुझ्या मालकीची नव्हती का आणि ती विकल्यानंतर, त्या पैशाचा वापर कसा करावा हे देखील तुझ्या अधिकारात नव्हते का? तर मग असे करण्याचे तुझ्या मनात कसे आले? तू केवळ मनुष्याबरोबर नाही तर परमेश्वराबरोबर लबाडी केली आहेस.”

  7. मग पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यासाठी तुम्ही कट का केला? ऐक, ज्या पुरुषांनी तुझ्या पतीला नुकतेच पुरले आहे त्यांचे पाय दारातच आहेत आणि ते तुलादेखील उचलून बाहेर नेतील.”

  8. “अहो ताठ मानेच्या लोकांनो! तुमची अंतःकरणे व कानांची सुंता अजूनही झालेली नाही. तुम्ही अगदी तुमच्या पूर्वजांसारखे आहात: तुम्ही नेहमी पवित्र आत्म्याला विरोध करता!

  9. आणि म्हणाला, “मला देखील हे सामर्थ्य मिळू द्या म्हणजे ज्या कोणावर मी आपले हात ठेवेन तेव्हा त्यांना पवित्र आत्मा लाभेल.”

  10. पेत्राने उत्तर दिले: “तुझ्या पैशांचा तुझ्याबरोबर नाश होवो, कारण परमेश्वराचे दान पैशाने विकत घेता येईल असा तू विचार केला!

  11. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात.

  12. पवित्र आत्म्याला विझवू नका.

  13. ज्यांना एकदा प्रकाश मिळाला होता, ज्यांनी स्वर्गीय दानांची रुची घेतली, जे पवित्र आत्म्याचे सहभागी झाले,

  14. ज्यांनी परमेश्वराच्या उत्तम वचनांची रुची घेतली आणि येणार्‍या जगाच्या महान सामर्थ्याचा अनुभव घेतला,

  15. जर त्यांचे पतन झाले तर त्यांना परत पश्चात्तापाकडे आणणे अशक्य आहे. ते परमेश्वराच्या पुत्राला पुन्हा एकदा क्रूसावर खिळतात आणि त्यांची सार्वजनिक नामुष्की करतात, यात त्यांचे नुकसान आहे.

  16. तर ज्याने परमेश्वराच्या पुत्राला पायाखाली तुडविले, शुद्ध करणारे साक्षीचे रक्त अपवित्र मानले, जेणेकरून ते स्वतः पवित्र झाले होते आणि कृपाशील पवित्र आत्म्याचा अपमान केला तो किती अधिक कठोर शिक्षा होण्यास पात्र ठरेल म्हणून तुम्हाला वाटते?

  17. ज्याचा शेवट मरणात नाही, असे पाप कोणा भावाच्या किंवा बहिणीच्या हातून घडताना तुम्हाला आढळले, तर परमेश्वराने त्यांना क्षमा करावी म्हणून तुम्ही प्रार्थना करावी आणि परमेश्वर त्यांना जीवन देईल. मी त्यांच्या बाबतीत सांगतो, ज्यांचे पाप त्यांना मरणाकडे नेत नाही. असे एक पाप आहे जे मरणाकडे घेऊन जाते. त्याबद्दल तुम्ही प्रार्थना करावी असे मी म्हणत नाही.