Skip to content

Noph बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. सोअनचे अधिकारी मूर्ख बनले आहेत, मेम्फीसच्या पुढाऱ्यांची फसवणूक झाली आहे; तिच्या लोकांच्या कोनशिलांनी इजिप्तला भरकटून टाकले आहे.

  2. मेम्फीस आणि तहपनहेसच्या सर्व लोकांनी तुमच्या कवट्यांना भेग पाडली आहे.

  3. यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:

  4. “इजिप्तमध्ये घोषणा करा, मिग्दोलमध्ये जाहीर करा; मेम्फीस व तहपनहेस या शहरांमध्येही जाहीर करा! ‘चला, सिद्ध व्हा, व मोर्चा बांधा, कारण तुमच्या सभोवतालच्यांना तलवार गिळंकृत करीत आहे.’

  5. तुमचे योद्धे कोलमडून का पडले? ते उभे राहू शकत नाहीत, कारण याहवेहने त्यांना खाली ढकलले आहे.

  6. ते पुन्हापुन्हा अडखळतील; ते एकमेकांवर कोसळून पडतील. ते म्हणतील, ‘चला, उठा, आपल्या लोकांकडे व आपल्या जन्मभूमीत आपण परत जाऊ, या छळवाद्यांच्या तलवारीपासून दूर जाऊ.’

  7. तिथे ते उद्गारतील, ‘इजिप्तचा राजा फारोह होफ्रा व्यर्थ गोंगाट करणारा मनुष्य आहे; त्याने त्याला मिळालेली सुसंधी घालविली.’

  8. “ज्याचे नाव सर्वसमर्थ याहवेह आहे, ते महाराज म्हणतात, ‘माझ्या जीविताची शपथ,’ जो येणार आहे, तो पर्वतांमधील ताबोर पर्वतासारखा, समुद्राजवळील कर्मेलासारखा आहे.

  9. इजिप्तमधील रहिवाशांनो, सामानाची बांधाबांध करा, कारण मेम्फीस शहराचा नाश होणार आहे व ते ओसाड होऊन एक निर्जन स्थान होईल.

  10. “ ‘सार्वभौम याहवेह म्हणतात: “ ‘मी मूर्तींचा नाश करेन आणि मेम्फीस येथील प्रतिमांचा मी शेवट करेन. इजिप्तमध्ये यापुढे राजकुमार नसतील, आणि संपूर्ण देशभर मी भय पसरवेन.

  11. इजिप्तचा पथरोस मी उजाड करेन, सोअन नगराला आग लावेन आणि नओ नगराला दंड देईन.

  12. सीन जो इजिप्तचा बळकट दुर्ग, यावर मी माझा कोप ओतेन, आणि नओचे सैन्य नष्ट करेन.

  13. मी इजिप्तला आग लावेन; सीन वेदनांनी तळमळेल. नओ वादळात उडून जाईल; मेम्फीस सातत्याने कष्टात राहील.