Nail बद्दल बायबलमधील वचने
प्रमुख बायबल वचने
सिसेरा थकून झोपलेला होता, परंतु हेबेराची पत्नी याएलने डेर्याची मेख आणि हातोडा घेतला आणि हळूच त्याच्याजवळ जाऊन त्याच्या कानशिलात तिने मेख ठोकली व ती आरपार जाऊन जमिनीत रुतून बसली आणि तो मरण पावला.
प्रवेशद्वारे आणि जोडपट्ट्या यांना लागणारे खिळे तयार करण्यासाठी दावीदाने विपुल प्रमाणात लोखंड, तसेच वजन करता येणार नाही इतका कास्य धातू पुरविला.
त्यात पन्नास शेकेल वजनाचे सोन्याचे खिळे वापरण्यात आले होते. वरचा भाग सुद्धा सोन्याने मढविला होता.
धातू कारागीर सोनाराला प्रोत्साहित करतो, आणि हातोडीने धातू गुळगुळीत करणारा, ऐरणीवर घण मारणार्यास उत्तेजन देतो. धातू जोडणीबद्दल तो म्हणतो, “हे चांगले आहे.” मग दुसरा, ती मूर्ती कलंडू नये म्हणून त्यास खिळे ठोकतो.
ते त्याला सोने आणि चांदीने सजवितात; ती एका जागी स्थिर रहावी, पडू नये म्हणून खिळे व हातोडा यांनी ती ठोकून घट्ट बसवितात.